सोनिया गांधी आणि मायावतींना भारतरत्न द्या, काँग्रेस नेत्याच्या मागणीवर अतुल भातखळकर म्हणतात….

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी सोनिया गांधी आणि बमायावती यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे (Atul Bhatkalkar slams Congress)

सोनिया गांधी आणि मायावतींना भारतरत्न द्या, काँग्रेस नेत्याच्या मागणीवर अतुल भातखळकर म्हणतात....
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 6:09 PM

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी ट्विटरवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक टोला लगावला आहे (Atul Bhatkhalkar slams Congress).

“जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न?”, असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे (Atul Bhatkhalkar slams Congress).

हरिश रावत नेमकं काय म्हणाले?

“सोनिया गांधी आणि मायावती मोठ्या राजकीय व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्या राजकीय निर्णयांशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल, पण सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच जनसेवाच्या मापदंडांना नव्या उंचीवर नेऊन ठेवल्याचं कुणीही नाकारु शकत नाही. आज त्यांना भारतीय महिलेचे गौरवशाली रुप मानलं जातं. त्याचबरोबर मायावती यांनी पीडित-सोशित लोकांच्या मनात अद्भूत विश्वास निर्माण केला आहे. भारत सरकारने यावर्षी या दोन्ही महिलांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं”, असं हरिश रावत ट्विटरवर म्हणाले.

रावतांच्या मागणीवर BSP नाराज

हरिश रावत यांनी सोनिया गांधी यांच्यासह मायावतींना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. असं असलं तरी रावत यांच्या या मागणीवर बसपा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हरिश रावत यांची मागणी फक्त जनतेला मुर्ख बनवण्याच्या रणनितीपेक्षा वेगळी नाही’, असं मत बसपा नेते के गौतम यांनी व्यक्त केलं आहे. यापूर्वी काँग्रेस सरकार दलितांचे आयकॉन असलेले बाबासाहेब आंबेडकर यांचा उचित सन्मान करण्यात अपयशी ठरली होती. मात्र, बसपा संस्थापक काशींराम साहू आणि मायावती यांच्यासह अन्य नेत्यांनी केलेल्या मागणीनंतर ते शक्य झालं, असंही मनोज यांनी म्हटलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.