’22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, खासगी आस्थापनांना आवश्यक ते निर्देश द्या’, भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

'22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, खासगी आस्थापनांना आवश्यक ते निर्देश द्या', भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 5:57 PM

मुंबई | 1 जानेवारी 2023 : अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी सर्वांना घरोघरी दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. राम मंदिराच्या उद्घाटन असणाऱ्या 22 जानेवारीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी अतुल भातळकर यांनी केली आहे. “राम मंदिराच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे. यासाठी खासगी आस्थापनांनासुद्धा आवश्यक ते निर्देश द्या”, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

“शतकानुशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम जन्मभूमी आयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्रीराम मंदिरात सोमवार, 22 जानेवारीला रामलल्ला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्त्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यादिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी”, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्र आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

‘शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली’

“22 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे 500 ते 550 वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे”, असं अतुल भातखळकर पत्रात म्हणाले.

‘सार्वजनिक सुट्टी जाहीर करा’

“त्यादिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरुपाचे निर्देश देण्यात यावेत”, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.