‘होय, मी त्याच रेस्टॉरंटमध्ये होतो, पण…’, बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोवर अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वाबनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपण चीनच्या मकाऊमध्ये एका हॉटेलमध्ये काल मुक्कामाला असून या हॉटेलच्या तळमजल्यावर रेस्टॉरंट आणि कॅसिनो असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी राऊतांनी केलेल्या दाव्यालादेखील उत्तर दिलंय.

'होय, मी त्याच रेस्टॉरंटमध्ये होतो, पण...', बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 4:29 PM

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी कॅसिनोचा फोटो ट्विट केलाय. संबंधित फोटो हा चीनच्या मकाऊचा असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तसेच हा फोटो 19 नोव्हेंबरच्या रात्रीचा असून फोटोत कॅसिनोमध्ये जुगार खेळणारी व्यक्ती ही हिदुत्ववादी नेता आहे, असा संजय राऊतांनी दावा केलाय. संबंधित फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरुय. विशेष म्हणजे भाजपकडून आपल्या ‘महाराष्ट्र भाजप’ या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये बावनकुळे आपल्या आयुष्यात कधी जुगार खेळले नाहीत, असं म्हटलं आहे.

संजय राऊत यांचं ट्विट नेमकं काय?

“19 नोव्हेंबर, मध्यरात्री, मुक्काम पोस्ट: मकाऊ, veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले , असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”, असे सवाल करत संजय राऊतांनी पहिलं ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटला भाजपकडून ‘भाजप महाराष्ट्र’ या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपकडून प्रत्युत्तर म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित करण्यात आला.

भाजपचं प्रत्युत्तर

“आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?”, असं ट्विट भाजपकडून करण्यात आलाय. ॉ

बावनकुळेंचं स्पष्टीकरण काय?

या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्यानंतर अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं. “मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय.

बावनकुळेंच्या ट्विटवर राऊतांचं पुन्हा एक ट्विट

“ते म्हणे, फॅमिलसह मकाऊला गेले आहेत. जाऊद्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे, कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय”, असं पुन्हा एक ट्विट संजय राऊतांनी केलंय.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.