AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे; तुमच्यामुळे जनतेला दुष्परिणाम भोगावे लागतील’

देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. | Devendra Fadnavis Shivsena

'फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे; तुमच्यामुळे जनतेला दुष्परिणाम  भोगावे लागतील'
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 7:44 AM

मुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि तत्सम उपाययोजनांना विरोध करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. लॉकडाऊन केले तर आम्ही रस्त्यावर उतरू, तांडव करू, असा इशारा भाजपचे (BJP) नेते देत आहेत. मात्र, विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. (Shivsena slams BJP leader Devendra Fadnavis over politicizing Coronavirus situation in Maharashtra)

जनतेला लॉकडाऊन नको असेल तर लोकांनी बेदरकारपणे जगणे सोडले पाहिजे. कामधंदा, रोजगार, शिक्षण, नाटक, सिनेमा, पर्यटनाचा आनंद सगळ्यांनाच हवा आहे. पण हे सर्व कधी शक्य आहे? जोपर्यंत कुडीत प्राण आहे तोपर्यंत. त्यामुळे लोकांनी आधी जीव वाचवावा, असा सल्ला शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आला आहे.

‘देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे’

आम्हाला काय कोणाची भीती? कोरोना आम्हाला स्पर्श करणार नाही, या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेमधून कोरोना वाढत गेला. कोरोनासंदर्भात सबुरीचे सल्ले देणारे या बेफिकिरी मंडळींना दुश्मन वाटू लागतात. देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.

राज्यात सर्वाधिक मृत्यू हे नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात कोरोनामुळे 54 रुग्णांनी जीव गमावला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचे सोडून द्यायला हवे. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचवायला पाहिजेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

सरकारला टाळेबंदी करुन लोकांना घरी बसवण्याचा छंद नाही

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही, असे सरसकट सगळ्यांचे मत आहे. लॉकडाऊन नकोच असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सांगत आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडत असल्याने सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत, असा पर्याय पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला आहे. प्रत्येकाचे म्हणणे आपापल्या पातळीवर योग्य आहे.

मात्र, कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. मुंबईत दररोजन पाच-सहा हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. इस्पितळे भरली आहेत व रुग्णांसाठी खाट नाहीत. हे चित्र राज्याला परवडणारे आहे का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या:

RTPCR Test : ‘मोठी बातमी, महाराष्ट्रात आता फक्त 500 रुपयात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी’, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

Maharashtra Corona : महाराष्ट्र सरकारचा ‘या’ 3T वर भर, यानंतर वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या थांबणार?

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता : नाना पटोले

(Shivsena slams BJP leader Devendra Fadnavis over politicizing Coronavirus situation in Maharashtra)

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.