Gopichand Padalkar : शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका महाभकास आघाडीने घेतला, पडळकरांचा हल्लाबोल

अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीनं वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमकं त्याचवेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे, असा आरोप भाजपा नेते गोपीचंद पडळकर (BJP Leader Gopichand Padalkar) यांनी केला आहे.

Gopichand Padalkar : शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका महाभकास आघाडीने घेतला, पडळकरांचा हल्लाबोल
गोपीचंद पडळकर, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 11:51 AM

मुंबई : शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटावर सरकारने कुठलीही मदत तर केलीच नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीनं वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमकं त्याचवेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे, असा आरोप भाजपा नेते गोपीचंद पडळकर (BJP Leader Gopichand Padalkar) यांनी केला आहे.

‘मुख्यमंत्री वर्षाच्या बाहेर पडायला तयार नाहीत’

महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)वर टीका करताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) वर्षाच्या बाहेर पडायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच महाभकास आघाडीनं घेतला आहे. पडळकर यांनी वीजतोडणीवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘अनेक त्रुटी व अनियमीतता’

दोन-दोन, चार-चार वर्षामागील वीजबीलं, पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबील देणं यात अनेक त्रुटी व अनियमीतता आहे. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यांनीशी वीजबीला(Electricity Bill)संदर्भातील भोंगळ कारभार उघडा पाडला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे’ ते म्हणाले, की मी समस्त शेतकरी भावांना आवाहन करतो, की ऐन कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे, आपापल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदाराकडे ते सूपूर्द करून पोचपावती घ्यावी. दरम्यान, राज्यभरात वीजतोडणीच्या विरोधात आंदोलन तापणार असे दिसत आहे. पडळकरांनी एसटी(ST Employees Strike)नंतर आता आपला मोर्चा वीजतोडणीच्या विरोधातल्या आंदोलनकडे वळवलाय.

मुंबईसह 23 महापालिका निवडणूकांवर टांगती तलवार, कोणत्या पालिकेतल्या किती जागा खुल्या होणार?

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी; आक्षेपांमध्ये तथ्य नाही, तनपुरेंचा दावा

प्राजक्त तनपुरे अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचा नवा नेता

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.