ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय, पडळकरांची जळजळीत टीका, फडणवीसांच्या निर्णयाचं कौतूक
राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आमने सामने उभे ठाकलेले सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली लढाई आता तुंबळ होताना दिसते आहे. OBC Political Reservation
मुंबई: राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आमने सामने उभे ठाकलेले सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली लढाई आता तुंबळ होताना दिसते आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शत प्रती शत ओबीसी उमेदवार देण्याचीच फडणवीसांनी काल घोषणा केलीय, त्यावर सत्ताधारी चेकमेट झाल्याचं चित्रं आहे. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्र्यांवर एकदम जळजळीत टिका केलीय. (BJP leader Gopichand Padalkar slam OBC Ministers of Maha Vikas Aghadi Government over OBC Political Reservation)
काय म्हणालेत गोपीचंद पडळकर?
पडळकर हे सांगलीतल्या झरेमध्ये बोलत होते. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवर यांच्यावर त्यांनी जहरी टिका केलीय. पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांचं काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालंय. आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय.जिथं ओबीसी मंत्र्यांच्याही शब्दाला मातीची किंमत नाहीये, तिथं सर्वसामान्य ओबीसींविषयी या प्रस्थापितांना किती आकस असेल. एकीकडे ओबीसी मंत्री म्हणतात “जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही” पण दुसऱ्याच दिवशी निवडणूका जाहीर होतात. काय किंमत झालीये ओबीसी मंत्र्यांची? तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का? तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का? आता बास झालं. ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वास घात करून निवडणूका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही ओबीसी बहुजनाच्या आक्रोशाची आग महाराष्ट्रभर पेटेल. आणि येत्या २६ तारखेला तुम्ही समस्त ओबीसी, भटके, बहुजन, अठरापगड बारा बलुतेदार समाजाची ताकद बघालच. तुमच्या गढ्यांना धक्का द्यायला आम्ही येतोय..
फडणवीसांचे आभार
पाच जिल्हा परिषदा आणि त्यातल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वच्या सर्व जागांवर फक्त ओबीसी उमेदवारच देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याची घोषणा फडणवीसांनी केलीय, त्यावर बोलताना पडळकर म्हणाले, ओबीसीं बांधवांसोबत दगाफटका करणाऱ्या आघाडी सरकारला मा. देवेंद्र फडणवीसांनी चोख उत्तर देत. येणाऱ्या निवडणूकांमध्ये भाजपाच्या सर्वच जागांवर ओबीसी उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल समस्त ओबीसी बहुजन बांधवांतर्फे मी मा. फडणवीसांचे आभार मानतो.. व मला विश्वास आहे या निर्णयाला समस्त बहुजन जनता साथ देईल..
कुठे होतेय निवडणूक?
सुप्रीम कोर्टानं ओबीसीचं आरक्षण रद्द केल्यानंतर पुन्हा 5 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. कोणत्या जिल्हा परिषदेत किती जागांवर निवडणूक होतेय ती पहा.
किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय? ……… धुळे – 15 नंदूरबार – 11 अकोला – 14 वाशिम -14 नागपूर -16
नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान? धुळे -30 नंदूरबार -14 अकोला -28 वाशिम -27 नागपूर -31
भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक, आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा https://t.co/X7mUqRh9FN #BJP #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2021
संबंधित बातम्या:
हस्तक्षेप करा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु, देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच आक्रमक आंदोलनाचा इशारा
’26 जूनच्या आंदोलनाच्या आगीत सरकार जळून जाईल’, ओबीसी आरक्षणावरुन सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
(BJP leader Gopichand Padalkar slam OBC Ministers of Maha Vikas Aghadi Government over OBC Political Reservation)