दादर स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरुन राजकारण तापलं, किरीट सोमय्यांचं रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र

दादरच्या ८० वर्षे जुन्‍या हनुमान मंदिरावर रेल्वेने पाडण्‍याची नोटीस बजावली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. मंदिराची १९६९ मध्ये धर्मदाय आयुक्‍तांकडे नोंदणी झाली असताना रेल्वेचा हा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे. भाजप नेत्यांनी मंदिर पाडू देणार नाही, असे म्हटले आहे. तर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून नोटीस मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.

दादर स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरुन राजकारण तापलं, किरीट सोमय्यांचं रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 9:39 PM

दादरच्या 80 वर्षे जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने दादरच्या हनुमान मंदिराच्या विश्वस्थांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटलंय की, दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या बाहेर अनधिकृत मंदिर आहे. 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी स्वत: पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल, असं नोटीसमध्ये म्हटल्याची माहिती आहे. खरंतर दादरमधलं हे मंदिर तब्बल 80 वर्षे जुनं असून स्टेशनवर काम करणाऱ्या हमालांनी बांधलंय. विशेष म्हणजे या मंदिराची सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून 1969मध्ये धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणीही झालीय. तरीही रेल्वेने 7 दिवसांचा अल्टिमेटम मंदिराच्या विश्वस्थांना दिलाय. अर्थात मंदिर तुटू देणार नाही, असं भाजपनं म्हटलंय. यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दरम्यान, हनुमान मंदिर आणि बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला आहे. एका फोनमध्ये मोदींनी युक्रेनचं युद्ध थांबवलं. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर पावलं उचलावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी रेल्वे विभागाला तसं पत्र देखील पाठवलं आहे. तसेच “दादरला हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटीसीचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मला दिले आहे. आम्ही ते मागे घेतील असे पाहू. अनेक दशके जुने हनुमान मंदिर पाडता येणार नाही”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या यांनी रेल्वे प्रशासनाला पाठवलेले पत्र

हे सुद्धा वाचा

बावनकुळेंनी ठाकरेंची लायकी काढली

उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही ठाकरेंनी लायकी काढली. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली. भाजपसाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रद्धा, प्राण आणि श्वास आहे. तुम्हाला विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच पण तुमची ती लायकी देखील नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.