सोमय्यांनी अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वरचा घोटाळा ईडीसमोर मांडला; ईडी अधिकारी म्हणाले…

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याचा घोटाळा ईडीसमोर मांडला आहे. (BJP leader Kirit Somaiya submits documents against jarandeshwar sugar mills to ED)

सोमय्यांनी अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वरचा घोटाळा ईडीसमोर मांडला; ईडी अधिकारी म्हणाले...
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 4:09 PM

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याचा घोटाळा ईडीसमोर मांडला आहे. या घोटाळ्याची मोड्स ऑपरेंटीही सोमय्या यांनी ईडीला सांगितली. तर या प्रकरणाचा अभ्यास करत असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमय्यांना सांगितलं. त्यामुळे अजित पवारही ईडीच्या कचाट्यात सापडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ईडी कार्यालयात जाऊन या घोटाळ्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर कारखान्याशी काही लोकही होते. अजित पवारांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला आहे. गुरु कमोडीच्या नावाने हा कब्जा घेतला आहे. हा गुरु कोणी व्यक्ती आहे का? अजित पवारांनी गुरु नाव का दिलं या कंपनीला. एका बाजुला गुरु कमोडीत लेअर उभे केले. दुसऱ्या बाजूला जरंडेश्वर मिल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये लेअर्स निर्माण केले. ज्या बिल्डरांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या, त्या दोन्ही बिल्डरकडे माया सापडली. त्यांनी अजित पवारांना 2008मध्ये 100 कोटी रुपये दिले होते. व्याज नाही. काही नाही असेच दिले. एका दमडीचा इंट्रेस्ट दिला नाही. आजही ते पैसे अजित पवारांकडे पडून आहे. हा सर्व घोटाळा ईडीसमोर मांडला. हायकोर्टात ऑब्जर्वेशन द्यावं अशी विनंती केली आहे, असं सोमय्या म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ संस्थापक इथे आले आहेत. कारखाना सुरू आहे. सुरू राहिल. कामगारांचं काम सुरू राहील. शेतकरी सुरक्षित राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बहिणींना फसवत आहेत का?

अजित पवारांनी मॅन्युप्युलेट करून कारखाना ताब्यात घेतला. अजित पवारांनी एक हजार कोटींची संपत्ती या बेनामी शृंखलांतून जमवली आहे. ईडीकडे त्याची माहिती दिली आहे. त्यावर अभ्यास करत असल्याचं ईडीने स्पष्ट केलंय. पवार कुटुंबीयांनी नौटंकी केली. ईडीच्या धाडी मारल्यानंतर अजित पवारांनी डोळ्यात अश्रू आणले. अजित पवारांच्या बहिणींच या कारखान्यांच्या मालक आहेत. त्यांनी बेनामी संपत्ती बहिणीच्या नावाने उभी केली, बहिणीला फसवलं की बहीणही त्यात बिझनेस इंटरप्युनर आहे?, असा सवालही त्यांनी केला.

अजितदादांचे मेव्हणेही पार्टनर

अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्या आहेत. त्यात त्यांचे मेव्हणेही पार्टनर आहेत. अजित पवारही पार्टनर आहेत. जरंडेश्वरमध्येही पार्टनर आहेत. दहा कंपन्यात पार्टनर आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

मला फरक पडत नाही

यावेळी त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यास नकार दिला आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नाही. ठाकरे पवारांनी सरकार आल्यापासून दहशत निर्माण केली आहे. नेव्ही ऑफिसरच्या घरी जाऊन मारहाण करणं, माझ्यावर हल्ला होणं या सर्व गोष्टी कॉमन आहेत. या सरकारने लुटमार केली. त्याचा मला फरक पडत नाही, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Aryan Khan Drugs Case | शाहरुखला पुन्हा झटका, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं, केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात व्यूहरचना?

असं काय आहे की 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळत नाहीय? वाचा 5 कारणे

(BJP leader Kirit Somaiya submits documents against jarandeshwar sugar mills to ED)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.