आता चंद्रावर मातोश्री 3 बांधायचा उद्धव ठाकरे यांचा विचार नाही ना?, भाजपा नेत्याचे बोचरे शब्द

संजय राऊत यांचे वक्तव्य आणि लिखाण म्हणजे गांजा आणि चिलीम. तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलात का? परिवाराला भेटलात का?. उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले मधल्या जेलरसारखी.

आता चंद्रावर मातोश्री 3 बांधायचा उद्धव ठाकरे यांचा विचार नाही ना?, भाजपा नेत्याचे बोचरे शब्द
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 12:48 PM

मुंबई : भाजपा नेत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागणारी टीका केली आहे. काल हिंगोलीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली होती. त्याला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलय. “आजकाल उद्धव ठाकरेंच्या सभा म्हणजे पूर्वीच्या काळात जे गावात येऊन महिला रडायच्या ते म्हणजे उद्धव ठाकरे. रडके उद्धव ठाकरे. यांना स्वतः चे विचार नाही, धोरण नाही. त्यामुळे हा त्यांचा पक्ष विचार धोरण सोडून बोलतो, आमची भाजपची संस्कृती अशी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मर्यादेत राहावे” अशी टीका भाजपा नेत्याने केली आहे.

“उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले मधल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर, आधे उधर आणि हे कडक जेलर. आम्हाला घर कोंबडा बोलायचं नाहीय, आमची संस्कृती तशी नाही. पण मर्यादेत राहवं” असं आशिष शेलार म्हणाले.

मग तुमच्या पोटात का दुखत आहे?

इंडियाच्या बैठकीबद्दल शेलार म्हणाले की, “हे इंडिया वगैरे काही नाही घमंडीय आहे. हे जरे सत्तेत आले, तर फक्त परिवारासोबत उडणारे फूल पाखरु आहेत” अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. “राज्याचे उपमुख्यमंत्री मेट्रोसाठी प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. मग तुमच्या पोटात का दुखत आहे? उद्भव ठाकरे AC च्या बाहेर आले नाहीत, ते काय शेतकऱ्याच्या मुद्यावर बोलणार?” असा सवाल शेलार यांनी विचारला.

संजय राऊत यांचे लिखाण म्हणजे गांजा आणि चिलीम

“संजय राऊत यांचे वक्तव्य आणि लिखाण म्हणजे गांजा आणि चिलीम ओढून लिहिणारे लोक. यंदाची दहीहंडी ही वरळीत होणार आहे. जांभोरी मैदानात होणार. भ्रष्टाचाराच्या जमापुंजीतून मातोश्री 2 बांधले आणि आता उरलेल्या पैशातून उद्धवजी चंद्रावर मातोश्री 3 बांधणार” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

बाकी सगळे बिळात होते

“राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा सन्मान होता. पण आता इंडिया आघाडीत त्यांना पाय धरावे लागत आहेत. स्वतःच्या पदाच्या लालसेपोटी किती पायघड्या घालतायत. गेल्या दहीहंडीत भाजप बाहेर होता, बाकी सगळे बिळात होते” अशी टीका भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली.

चंद्रावर मातोश्री 3 बांधायचा विचार नाही ना?

“न्यायालयातील दहीहंडीची लढाई आम्ही लढलो आणि जिंकलो. शिंदे सरकारने लढाई लढली आणि आता प्रो गोविंदा होत आहे त्यामुळे स्टुलावर चढून फोडणार आहेत” अशी टीका आशिष शेलार यांनी केली. “वरळीत यावर्षीसुद्धा आम्ही दहीहंडी भरवणार. चांद्रयान 3 च्या यशाबद्दल तुम्ही शुभेच्छा दिल्या नाहीत. चंद्रावरच्या घराबाबत बोलत असाल, तर तुमच्यावर मुंबईकरांचा विश्वास नाही” असं शेलार म्हणाले. “आता चंद्रावर मातोश्री 3 बांधायचा, तर उद्धव ठाकरे यांचा विचार नाही ना” असं आशिष शेलार म्हणाले. तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलात का?

“नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे राजकरण करू नये. त्यांच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलात का? परिवाराला भेटलात का? हे संजय राऊत यांनी सांगावे” असा सवाल आशिष शेलार यांनी केला. “आम्ही विधान सभेत हा विषय मांडला आणि फडणवीसांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिला आहे. त्यावेळी ठाकरेंच्या आमदारांना भूमिका मांडावी असं का नाही वाटलं” असं आशिष शेलार म्हणाले.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.