Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्यावर निर्णय घेण्याची वेळ? ‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत मोठं वक्तव्य

पंकजा मुंडे यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोकपणे भाष्य केलं. पंकजा यांनी काही दिवसांपूर्वी आपण निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आज महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्यावर निर्णय घेण्याची वेळ? 'टीव्ही 9 मराठी'च्या मुलाखतीत मोठं वक्तव्य
Parali Pankaja Gopinath Munde on Shaivshakti Parikrama Yatra BJP Marathi News
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 7:12 PM

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या रोखठोक कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला निर्णय घ्यावा लागले, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली. या सर्व घडामोडींवर पंकजा यांनी रोखठोक भूमिका मांडली. “ईश्वर न करो आपल्यावर निर्णय घेण्याची वेळ येवो”, असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.

“माझ्याविषयी कुणीही अफवा उठवू नका. मला जेव्हा आयुष्यातही काहीही निर्णय असेल, असा निर्णय आयुष्यात घेण्याची वेळ कधीही येऊ नये. कारण जसं एक विवाहबंधन असतो तसं संघटनेशी आपलं एक बंधन असतं. आपण नकळत एकमेकांना वचन, आणाबाका, शपथा दिलेल्या असतात. आपण एका विचारधारेवर प्रेम केलेलं असतं. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय कोणत्याही व्यक्तीला घ्यावा लागेल तर तो निर्णय खूप त्रासदायक असतो”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“माझ्यासाठी तो निर्णय प्रचंड त्रासदायक असेल. कारण मी या संघटनेत माझ्या वडिलांना बघितलेलं आहे. माझ्यासाठी ती एक वेग अटेचमेंट आहे. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय घेण्याची वेळ कुणावर येऊच नये, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी म्हटलेलं आहे, पंकजा मुंडे निर्णय घेईल तर ती स्वत: तुम्हाला बोलवून सांगेन”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘अमित शाह यांनी वेळ दिला नाही’

यावेळी पंकजा मुंडे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. आपण आपलं म्हणणं अमित शाह यांच्याकडे मांडू, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. याबाबत त्यांना विचारला असता अमित शाह यांनी आपल्याला वेळ दिला नाही, असं अमित शाह यांनी सांगितलं.

“अजून तरी मला त्यांची वेळ मिळालेली नाही. ते मध्यंतरी लोकसभेच्या अधिवेशनात व्यस्त होते. त्यांची वेळ का नाही मिळाली? याचं उत्तर मी देऊ शकत नाही. त्यांची वेळ अजून मिळाली नाही. ते आता निवडणुकीत व्यस्थ असतील. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा मी सांगेन”, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.