उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलन म्हणजे आदळआपट वाटते, ते निव्वळ टाईमपास करतायत: दरेकर

Pravin Darekar | उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार मानले होते. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत, असे उद्धव यांनी म्हटले होते.

उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलन म्हणजे आदळआपट वाटते, ते निव्वळ टाईमपास करतायत: दरेकर
प्रविण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 2:26 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचं राजकारण करत असल्याची टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटते. मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. आताचा संघर्ष ही तर केवळ ठिणगी आहे, त्याचं वणव्यात कधी रुपांतर होईल, ते कळणारही नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढावा, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले. (BJP leader Pravin Darekar take a dig at CM Uddhav Thackeray)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून ते आरक्षण न्यायालयात टिकवलं. मराठा आरक्षणाचा कायदा करुन तो ही त्यांनी उच्च न्यायालयात टिकवला. मात्र, महाविकासआघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.

OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.

संबंधित बातम्या:

जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही? प्रवीण दरेकरांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

माझ्या हातात सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : फडणवीस

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.