संजय राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता?; भाजप आमदार म्हणतात, शिवसेना भवनात फ्रेम करुन ठेवला!

| Updated on: Mar 03, 2021 | 10:46 AM

शिवसेना नेते संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस उलटले तरी राठोड यांचा अद्याप राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. (bjp leader sanjay kute slams cm uddhav thackeray over sanjay rathod resign)

संजय राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता?; भाजप आमदार म्हणतात, शिवसेना भवनात फ्रेम करुन ठेवला!
संजय कुटे, आमदार भाजप
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस उलटले तरी राठोड यांचा अद्याप राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल संजय कुटे यांनी केला आहे. (bjp leader sanjay kute slams cm uddhav thackeray over sanjay rathod resign)

संजय कुटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केलं. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राठोड हे अजूनही वनमंत्री आहेत. जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असं म्हणता येणार नाही, असं सांगतानाच राजीनामा राठोडांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा. त्यांचा राजीनामा मातोश्री किंवा शिवेसना भवनात फ्रेम करून ठेवला आहे का? असा सवाल कुटे यांनी केला.

तोपर्यंत लढाई सुरूच

जोपर्यंत राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहिल. पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

शिवसेना नेते संजय राठोड यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वन मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहितीही दिली होती. यावेळी त्यांना राजीनामा मंजूर केला का? असा सवाल करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी, राजीनामा हा काय फ्रेम करून ठेवण्यासाठी नसतो, असं उत्तर दिलं होतं. तसेच राठोड यांच्या खात्याचा पदभार माझ्याकडेच आहे. त्यांच्या खात्याचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. अधिवेशनात त्यांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न आल्यास मी त्याला उत्तर देईन किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री उत्तरं देतील, असंही त्यांनी सांगितलं होतं.

राजीनामा मंजूर होण्याची प्रक्रिया काय आहे?

भारतीय घटनेच्या कलम 153 ते 174 मध्ये राज्यपालांच्या नियुक्तीपासून ते त्यांचे कर्तव्य आणि अधिकाराची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे कोणत्याही आमदार किंवा मंत्र्यांनी थेट राज्यपालांकडे राजीनामा दिल्यास किंवा मुख्यमंत्र्यांनी संबंधित सदस्याच्या निष्काषनाची शिफारस केल्यास राज्यपाल ती मंजूर करतात. एखादा आमदार किंवा मंत्री आपल्या पक्षाच्या अध्यक्षांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देऊ शकतो. मात्र, जोपर्यंत पक्षाचा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री राज्यपालांकडे संबंधित सदस्याचा राजीनामा पाठवत नाही, तोपर्यंत संवैधानिकदृष्ट्या तो राजीनामा मंजूर होत नाही. त्यामुळे राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत हा राजीनामा राज्यपालांकडे जात नाही आणि राज्यपाल मंजुरी देत नाही, तोपर्यंत राठोड यांनी राजीनामा दिला असं म्हणता येत नाही, असं राजकीय जाणकारांनी सांगितलं. (bjp leader sanjay kute slams cm uddhav thackeray over sanjay rathod resign)

 

संबंधित बातम्या:

एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा

‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र

…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर; सीएम म्हणतात, तो काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही!

(bjp leader sanjay kute slams cm uddhav thackeray over sanjay rathod resign)