भाजपच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लीलावती रुग्णालयात दाखल

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शाहनवाज हुसैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाहनवाज हुसैन हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री होते.

भाजपच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका, लीलावती रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 9:08 PM

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शाहनवाज हुसैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाहनवाज हुसैन यांना आज दुपारी चारच्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून महत्त्वाची माहिती

लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी शाहनवाज हुसैन यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची एंजिओप्लास्टी केलीय, अशी माहिती डॉक्टर जलील पारकर यांनी दिलीय.

शाहनवाज हुसैन हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत. ते बिहार सरकारमध्ये उद्योग मंत्री देखील होते. ते तीनवेळा लोकसभेचे खासदार आणि एकदा बिहार विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. शाहनवाज हुसैन हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री देखील होते.

शाहनवाज हुसैन यांना हृदय विकाराचा झटका आल्याची बातमी वाऱ्यासारखी देशात पसरली आहे. विशेष म्हणजे मुंबईत, बिहार, बिहार भाजप आणि महाराष्ट्र भाजपमध्ये या घटनेच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांकडून हुसैन यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.