Mumbai Rains: मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली, शिवसेना खासदाराचा दावा

हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात होती. | Water logging in Mumbai

Mumbai Rains: मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली, शिवसेना खासदाराचा दावा
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 1:07 PM

मुंबई: पहिल्याच पावसात मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांचे पितळ उघडे पडल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. पहिल्याच पावसात मुंबईच्या सखल भागांमध्ये प्रथेप्रमाणे पाणी साचून (Water Logging) जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेला चांगलेच धारेवर धरले होते. (Water logging in Mumbai due to Modi govt says Shivsena MP Rahul Shewale)

या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी एक नवा दावा केला आहे. त्यांनी शनिवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्यानंतर हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात होती. मात्र, ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकले नाही. परिणामी हिंदमाता परिसरात पाणी साचत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. यावर आता भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तसेच मुंबईतील अतिवृष्टीसाठी ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार आहे. मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन राहुल शेवाळे यांनी केले.

मुंबईतील निर्बंध आणखी शिथील होणार

ब्रेक द चेन मोहिमेच्या तिसऱ्या स्तरात समावेश असलेल्या मुंबईचा लवकरच दुसऱ्या स्तरात समावेश केला जाईल. त्यामुळे मुंबईतील निर्बंध आणखी शिथील होतील. त्यामुळे व्यापाऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली. लसीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे. शिवसेनेकडून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना लस दिली जात आहे. इतर लोकांनाही लस मिळत असल्याचा आनंद आहे. आम्ही ठिकठिकाणी असे कार्यक्रम राबवू, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Weather Alert: मुंबई आणि कोकणात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याचा रेड अलर्ट

दाणादाण! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भागात पाणी भरले, रस्तेही पाण्याखाली!

Mumbai Rains : झोडपणे सुरूच … पावसामुळे मुंबईतील रस्ते पाण्यात, पाहा फोटो!

(Water logging in Mumbai due to Modi govt says Shivsena MP Rahul Shewale)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.