महायुतीला किती जागा मिळणार…भाजपचा सर्व्हेत काय? विनोत तावडे यांनी दिली आकडेवारी
Vindo Tavade: हरियाणात जे घडलं ते विधानसभेत घडेल. लोकसभेत आम्हाला जागा कमी आल्या. फार कमी होत्या. आता एमआयएम, वंचित, समाजवादी पार्टी हे काही मते घेणार आहे. पण महायुतीत अशी मतांची विभागणी होणार नाही. त्यामुळे आमच्या जागा वाढणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी निकाल येणार आहे. त्यापूर्वी काही सर्व्हेसुद्धा आले आहेत. तसेच विविध पक्षही आपले सर्व्हे करत असतात. आता भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्व्हेत महायुतीला किती जागा मिळणार? याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि नेते विनोद तावडे यांनी दिली. ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
काय आहे भाजपचा सर्व्हे
विनोद तावडे यांनी सांगितले की, आमचा सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप ९५ ते ११० जागा जिंकेल. शिवसेनेला ४० ते ५० जागांवर विजय मिळेल. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला २५ ते ३० जागा मिळेल. या निवडणुकीत बहुमत आम्हाला मिळेल. महायुतीला १६५ पर्यंत जागा मिळतील, असा दावा विनोद तावडे यांनी केला.
हरियाणात अशी होती रणनिती
हरियाणात काँग्रेसने एकाच समाजाचा विषय केला. त्यानंतर ओबीसी एकत्र आले आणि आम्ही हरियाणात १० वर्ष काम केले होते. विकास केला होता. समाज सोबत आला आणि आमचा विजय सोपा झाला. ज्या पद्धतीने महायुतीने पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि डायरेक्ट बेनिफिट केले. रस्ते, मेट्रो आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना आणली. हा इनडायरेक्ट बेनिफिट. आणि शून्य विजेचं बिल, पिक विमा योजना आणि लाडकी बहीण योजना हा डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे.
मोदी समर्थकांनी मतदान केले नाही…
हरियाणात जे घडलं ते विधानसभेत घडेल. लोकसभेत आम्हाला जागा कमी आल्या. फार कमी होत्या. आता एमआयएम, वंचित, समाजवादी पार्टी हे काही मते घेणार आहे. पण महायुतीत अशी मतांची विभागणी होणार नाही. त्यामुळे आमच्या जागा वाढणार आहे. अब की पार ४०० झाले. मोदी भक्तांनी मतदान केले नाही. मोदी येणारच आहे, असं म्हणून मतदान झालं नाही. त्यामुळे चार पाच टक्के मतदान कमी झालं. त्याचा फटका बसला, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
विनोद तावडे यांच्यानुसार, अशा मिळतील जागा
- भाजपला ९५ ते ११०
- शिवसेना ४५ ते ५५
- अजित पवार राष्ट्रवादी २५ ते ३०
- महायुती १६५ ते १७० पर्यंत