बेस्टच्या 900 ई- बसेसच्या 3600 कोटींच्या कंत्राटात घोटाळ्याचा आरोप, भाजप नेत्यांचा नेमका दावा काय?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणत, मुळात 900 ई-बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की कॅासेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे.

बेस्टच्या 900 ई- बसेसच्या 3600 कोटींच्या कंत्राटात घोटाळ्याचा आरोप, भाजप नेत्यांचा नेमका दावा काय?
बसेसच्या खरेदीवरून भाजपचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 3:41 PM

मयुरेश गणपत्येय, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिका (BMC) ज्या नव्या ई-बसेस (E-bus) खरेदी करत आहे, त्यात घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना यावरून काही सवाल केल आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणत, मुळात 900 ई-बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की कॅासेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी 3600 कोटींचा निधी मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी दिला. पण त्याच्यावर डल्ला विशिष्ट ठेकेदाराच्या भल्यासाठी मारला जातोय.असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. निविदा 200 इ-बसेसची निघते. ती नंतर 400 केली जाते आणि मंजूरी मिळेपर्यंत कुठलीही पुनर्निविदा न काढता ती 900 होते. वास्तविकतेत आपण कधी जमीनीवर उतरून पाहणी केली आहे का? की 900 दुमजली बसेस मुंबईच्या रस्त्यावर खरोखर त्या धावू शकतील का? याचा कधी फिजीबीलीटी रिपोर्ट घेतलाय का? किंबहूना ही खरेदी फक्त कागदावरतीच करायचा हेतू नाहीये ना? असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत.

कत्राट कोणत्या आधारावर देत आहात?

या कंपनीचं भाग भांडवल फक्त एक लाख रूपये आहे. त्यांना तुम्ही 2800 कोटीचं कंत्राट कोणत्या आधारावर व कोणत्या हेतूसाठी देत आहात? याची आम्ही मुंबईकरांसमोर पोलखोल करणार. तसेच 2800 कोटींच्या घोटाळ्याबाबत आम्ही कॅग आणि न्यायालयात दाद मागणार. आम्ही मुंबईकरांचा मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क तुमच्या घोटाळ्याने हिरावू देणार नाही. अशी टीका त्यांनी केली आहे. त्यामुळ बसेची खरीदी आता सवालांच्या घेऱ्यात आली आहे.

एका कंपनीच्या फायद्यासाठी कंत्राट

डिसेंबरमध्ये 200 दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रीक बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा बेस्टकडून काढण्यात आली होती. मात्र प्रस्ताव मजुरी करतांना 200 च्या 900 बसेस एकंदरीत 3600 कोटींचे कंत्राट आणि त्यापैकी एक विशिष्ट कंपनी कॉसीस ई-मोबिलिटी (Causis E-mobility Pvt. Ltd.) ह्यांच्या खिशात घातल्याचा आरोप होतोय. 700 बसेसची पुनर्निविदा न काढता 2800 कोटींचे कंत्राट देण्याचे कारस्थान सत्ताधारी पक्षाने केलेले आहे. ह्या विषयावर पोलखोल करण्यासाठी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक विनोद मिश्रा, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, रेणु हंसराज, बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य उपस्थित होते. असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

VIDEO | ठाकरेंविरोधात बोललात तर महागात पडेल, भाजप आमदार प्रशांत ठाकुरांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी

शाळेतील गीता पठणावरून वाद, भाजपच्या मागणीला समाजवादी पार्टीचा तीव्र विरोध; महापौरांना लिहिलं पत्रं

शिवसेना-नारायण राणे वादाचा नवा अंक, BMC ची राणेंना नोटीस, अधिश बंगल्याची पाहणी करणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.