आठवड्याला आयुक्तांची भेट, नवी मुंबईला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार, आमदार गणेश नाईक मैदानात
कोरोनाच्या महामारीतून नवी मुंबईला मुक्त करण्यासाठी आमदार गणेश नाईक देखील मनपा प्रशासनासोबत मैदानात उतरले आहेत (BJP MLA Ganesh Naik on Navi Mumbai Corona).
नवी मुंबई : कोरोनाच्या महामारीतून नवी मुंबईला मुक्त करण्यासाठी आमदार गणेश नाईक देखील मनपा प्रशासनासोबत मैदानात उतरले आहेत (BJP MLA Ganesh Naik on Navi Mumbai Corona). कोरोना काळात घरी बसून न राहता प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक कामाला लागले आहेत. प्रशासनाकडे काम करण्याचे अधिकार असतील, तर ते काम कसं व्हावं, कुठे व्हावं, कसं करावं याबाबत गणेश नाईक सूचना करत आहेत. यासाठी ते दर आठवड्याला मनपा आयुक्तांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा करणार आहे.
गणेश नाईक यांनी या आधीही आयुक्तांची भेट घेतली होती. मंगळवारी (28 जुलै) पुन्हा एकदा त्यांनी आयुक्तांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा केली. अनेक देश कोरोनावरील लसीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. लवकरच कोरोनाची लस बाजारात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे नवी मुंबई मनपाने जेव्हा बाजारात लस येईल तेव्हा त्वरित विकत घेऊन सामान्य नवी मुंबईकरांना उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
भाजप आमदार गणेश नाईक यांनी आज मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेत शहरात वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावा संदर्भात चर्चा केली. याआधी गणेश नाईक यांनी नवं नियुक्त आयुक्तांची भेट घेत नवी मुंबई महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच यामुळे कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप केला होता.
यानंतर लगेचच मनपाने नवी मुंबईत आयसीयू आणि व्हेंटिलेटर खाटांची संख्या वाढवण्यासंदर्भात काम सुरु केलं. महिनाभरात व्हेंटिलेटर बेडची संख्या दुप्पटीने वाढवणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा :
मुलींनाही भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी, पुण्यासह देशातील 6 ठिकाणी भरती
कार्यकारिणीच्या निवडीवरुन नाराज, भाजप कार्यकर्त्याची नड्डा-चंद्रकांत पाटलांना नोटीस
BJP MLA Ganesh Naik on Navi Mumbai Corona