चोर, नाग आणि बेडूकची एकमेकांना उपमा, आमदार आणि माजी नगरसेवकात जुंपली; मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद पेटला

दहिसरमधील एका गल्लीत ट्रान्फॉर्मर बसवण्याचं श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे. या मुद्द्यावरून भाजपच्या आमदार आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक आमने-सामने आले आहेत.

चोर, नाग आणि बेडूकची एकमेकांना उपमा, आमदार आणि माजी नगरसेवकात जुंपली; मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद पेटला
manisha chaudhary
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 2:42 PM

मुंबई: दहिसरमधील एका गल्लीत ट्रान्फॉर्मर बसवण्याचं श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे. या मुद्द्यावरून भाजपच्या आमदार आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक आमने-सामने आले आहेत. एवढेच नव्हे तर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नाग, बेडूक आणि चोरांची उपमा दिली आहे. त्यामुळे दहिसरमधील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे.

मुंबईतील दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर गल्ली क्रमांक 7 मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तेजस्विनी अभिषेक घोसाळकर आणि शिवसेनेचे माजी आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांच्या हस्ते आज सकाळी ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी घोसाळकर कुटुंबाला चोर आणि नाग म्हटले. त्याला शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. घोसाळकर यांनी पावसाळी बेडूक म्हणत चौधरी यांच्यावर घणाघाती टीका केली.

शिवसेनेकडून 2 हजार झोपड्यांना वीज

यापूर्वी आम्ही 30 जुलै रोजी या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन केले होते. पावसात बेडूक येतात, आजही मुंबईत दोन दिवस पाऊस पडत आहे. वाटेत पाणी आहे, बेडूक जात आहेत. पुन्हा बाहेर येण्यासाठी बेडकांची धडपड सुरू आहे. ते बाहेर येऊन श्रेय घेणार आहेत. हे काम कोणी केले हे जनतेला माहीत असताना असे बेडूक बाहेर येत राहतात, शिवसेना आज 2 हजार झोपड्यांना वीज देण्याचे काम करत आहे, असं अभिषेक घोसाळकर यांनी सांगितलं.

चोरासारखं उद्घाटन केलं

घोसाळकर यांच्या या आरोपाला भाजप आमदार मनिषा चौधरी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही वीज लाईन टाकण्याचे काम करत असताना स्थानिक नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी पत्र लिहून नकार दिला होता. मी फक्त माझा कामाचे श्रेय घेत आहे. तुम्ही जर काम केले आहे तर चोरून कामाचं उद्घाटन करण्याची गरज काय होती? सकाळी 7 वाजता चोरासारखे उद्घाटन करण्याचं नाटक केलं. उजळ माथ्याने तुम्ही उद्घाटन करू शकले नाही. कारण तुमच्या मनात चोरी होती, अशी टीका चौधरी यांनी केली.

सापाने आम्हाला डंख मारला

आम्ही बेडूक नाही. बेडूक तुम्ही आहात. कमळ पाण्यात फुलते. तुम्ही आम्हाला पावसाळी बेडूक म्हटले असेल तर तुम्ही साप आहात. ज्या सापाला आपण 25 वर्षे दूध पिऊन पाळले, त्या सापाने आपल्याला डंख मारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे, अशी जहरी टीकाही चौधरी यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

BMC Elections: मुंबईतील अतिरिक्त 9 वॉर्ड शिवसेनेला तारणार की भाजपला?; या निर्णयामागे नेमकं दडलं काय?

Narayan Rane: नारायण राणेंना 8 कमांडोंचं सुरक्ष कवच; केंद्राकडून राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

सहकाऱ्यांची मस्करी तरुणाच्या जीवावर, गुदमार्गात हायप्रेशर हवा भरली, भिवंडीत तरुणाचा मृत्यू

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.