संजय राऊत यांच्या मालकाच्या मुलाची अशी माहिती बाहेर येईल की….नितेश राणे यांचा सज्जड दम
Nitesh Rane on Sanjay Raut: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागा लढविण्याबाबत चर्चा होत आहे. शेवटच्या 48 तासांत जरी जागा जाहीर झाली तरी महायुतीचा उमेदवार निवडून येत आहे. महायुतीला एकत्र ठेवण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
मुंबई | 21 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जितकी टीका करतील तेवढे ते खड्ड्यात जातील. एकीकडे मालकाच्या मुलाला वाचविण्यासाठी संजय राऊत आणि त्याच्या मालकाची बायको दिल्ली वाऱ्या करत आहेत. राऊत यांच्या टीकेची पातळी खालवली आहे. त्यांनी मोदींची औरंगजेबसोबत तुलना करुन देशभरातील नागरिकांचा अपमान केला आहे. त्यात सुधारणा केली नाहीतर मालकाची आणि मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल. त्यानंतर रोज औरंगजेब आठवेल, असा हल्ला नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला.
संजय राऊत यांना काँग्रेसची सुपारी
देशातील जी धार्मिक स्थळे काँग्रेसच्या काळात अंधारात होती. त्यांना उजेडात आणण्याच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल आहे. मोदी यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे. दुसरीकडे राहुल गांधीना किती वेळा लॉन्च केले तरी ते आपल्या पायावर उभे राहणार नाहीत. त्यांची मशीन बंद पडली आहे. संजय राऊत यांनी भाजपसोबत युती करु नये, म्हणून त्यांना काँग्रेसने सुपारी दिली आहे. स्वार्थाचे दुसरे नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहे, असा हल्ला नितेश राणे यांनी केला. काही काळासाठी कोण जेलच्या बाहेर आहे. त्यानंतर जेलमध्ये बसून औरंगजेबाची पुस्तक वाचावी, असा टोला संजय राऊत यांचे नाव न घेता नितेश राणे यांनी लगावला.
राज ठाकरे यांचे युतीमध्ये स्वागत
राज ठाकरे यांना युतीमध्ये यायचं असेल तर त्याला आकार देणे गरजेच आहे. त्यासाठी आज बैठक होत आहे. त्याचे युतीमध्ये स्वागतच आहे. हिंदुत्वाचा विचार सर्वांना घेऊन भक्कम होत असेल तर राज ठाकरे यांना आम्ही महायुतीत घेऊ. परंतु त्यावर इतरांना मिरच्या का लागत आहे. तुम्ही वंचितला घेता तेव्हा चालते का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागा लढविण्याबाबत चर्चा होत आहे. शेवटच्या 48 तासांत जरी जागा जाहीर झाली तरी महायुतीचा उमेदवार निवडून येत आहे. महायुतीला एकत्र ठेवण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.