Nitesh Rane | ‘हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस,’ जागोजागी नितेश राणेंच्या फोटोचे बॅनर, नवा वाद पेटणार ?
गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे एक बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहण्यात आलीय. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षिस म्हणून दिली जाईल असंही लिहण्यात आलंय.
मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जामीन फेटाळल्यानंतर कोकणात तसेच कणकवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तर दुसरीकडे जामिनासाठी आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठवू अशी माहिती नितेश राणे यांच्या वकिलांनी दिली असून त्यांचा ठावठिकाणा अजूनही कोणाला लागलेला नाही. पोलीस त्यांचा शोध घेतच आहेत. या पार्श्वभूमीवर गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहण्यात आलीय. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल असंही लिहण्यात आलंय.
नितेश राणेंना शोधा, कोंबडी बक्षीस
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जामिनासाठी त्यांना आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे. त्यामुळे अजूनही राणे अज्ञातवासात आहेत. ते नेमके कोठे आहेत. त्यांच्या ठावठिकाणा काय ? याची अजूनही कोणाला माहिती नसून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, आता राणे कुटुंबीयांना डिवचणारे बॅनर गिरगावमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे चक्क गायब असल्याचा दावा करण्यात आलाय. नितेश राणे हरवले असून त्यांना शोधून देणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस दिली जाईल असेदेखील या बॅनरवर लिहण्यात आलंय. या बॅनरमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मुंबईत शिवसेना विरुद्ध राणे
हे पोस्टर नेमके कोणी लावले याची माहिती मिळालेली नाही. मात्र भाजप आमदार नितेश राणे यांची ओळख सांगणारी माहिती देखील या बॅनवर लावण्यात आलीय. ही माहिती नितेश राणे यांना डिवचणारी आहे. या बॅनरमुळे आता तळकोकणातील शिवसेना विरुद्ध राणे हा शिमगा आता मुंबईतही सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय.
राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची आवश्यकता नाही
दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का? किंवा पोलीस नितेश राणेंना अटक करणार का? असा सवाल केला जात आहे. मात्र, नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ; तोपर्यंत नितेश राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची गरज नाही, असं नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितलेलं आहे. तसेच पोलिसांनी त्यांना अटक केली तर आम्ही जामीनासाठी अर्ज करु असंही त्यांनी यापूर्वी सांगितलं आहे.
इतर बातम्या :