‘उद्धव ठाकरे पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीय’, भाजपा आमदाराचे जहरी शब्द

'उद्धव ठाकरे यांना मुंबईतील कचऱ्यातून उचलून आणलय का?' 'खरच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? DNA तपासण्याची वेळ आलीय. कुठल्याही अँगलने बाळासाहेबांच रक्त याच्यामध्ये आहे, या संशयावर शिक्कामोर्तब होत चाललय"

'उद्धव ठाकरे पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीय', भाजपा आमदाराचे जहरी शब्द
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 2:23 PM

मुंबई (निवृत्ती बाबर)  : “वर्षानुवर्ष आमच्या मनामध्ये जो संशय होता, तो वाढत चालला आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब होत चाललय. खरच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? की त्याला मुंबईतील कुठल्या कचऱ्याचून उचलून ठाकरे आडनाव दिलय. त्याच्यामधील गुण, विचार पाहता आता त्यांच रक्त, डीएनए तपासण्याची वेळ आली आहे. कुठल्याही अँगलने बाळासाहेबांच रक्त याच्यामध्ये आहे, या संशयावर शिक्कामोर्तब होत चाललय” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. “उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रेमात पडले आहेत. त्यांना ऐकल्यानंतर अशी व्यक्ती कधीच ठाकरे यांच्या घरात जन्माला येऊ शकत नाही किंवा बाळासाहेबांचा हा मुलगा होऊ शकत नाही यावर शिक्कामोर्तब होत चाललय” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

“राम मंदिराच्या निर्माणासाठी हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकेर आयुष्यात अनेक संकटांना सामोर गेले. स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. राम मंदिर अयोध्येत बनावं यासाठी कडवट भूमिका घेतली. त्या बाळासाहेबांचा मुलगा सांगतो की, तिथे जाणाऱ्या भक्तांच्या ट्रेनमध्ये आग लागेल, दंगली भडकतील. अशी वक्तव्य करत असेल, तर खरच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? हे विचारण्याची वेळ आलीय” असं नितेश राणे म्हणाले. “उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या शरीराबद्दल बोलतात. हातवारे करुन दुसऱ्याच्या शरीराच विश्लेषण करतात. स्वत:च्या शरीराचा थांगपता नाही. पुरुष आहे की, स्त्री हे तपासण्याची वेळ आलीय. अशा व्यक्तीने दुसऱ्याच्या शरीराबद्दल बोलाव?” असं नितेश राणे म्हणाले. “उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी खुल्या व्यासपीठावर यावं. तू तुझं विश्लेषण सुरु कर. आम्ही आमचं विश्लेषण करतो. नाही तुझं, थोबाड बंद करुन कायमच घरी बसवलं, तर मी माझा नाव बदलून टाकेन” असं नितेश राणे म्हणाले.

‘पण यांनी नमकहरपणा केला’

“देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे वारंवार बोलतात. पण 2014 ते 2019 मध्ये जेवढं रक्ताच्या भावाने याला संभाळल नाही. ज्यांना उद्धव ठाकरेंनी संपवण्याचा प्रयत्न केला, तेवढ प्रेम आणि विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पण यांनी नमकहरपणा केला” असा आरोप नितेश राणे यांनी केला.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.