‘मी राजीनामा मागणार नाही, दोषींना बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल’, सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य

रात्र संपत असली तरी घडामोडी संपायचं नाव घेत नाहीयत. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पीडित देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर येत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी नवी माहिती देत गौप्यस्फोट देखील केले.

'मी राजीनामा मागणार नाही, दोषींना बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल', सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य
सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 10:49 PM

भाजप नेते सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना महत्त्वाची माहिती दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जवळपास 45 मिनिटे वेळ दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही. तो कितीही मोठा असो, काहीही असो, त्यांचे बंधू धनंजय देशमुख आज बऱ्याच गोष्टी बोलले आहेत. बऱ्याचशा बाबी अशा आहेत की, आज तपास यंत्रणा असल्यामुळे काही गोष्टी मीडियासमोर बोलून तपासात अडचणी निर्माण होऊ नये अशा प्रकारचं मी वक्तव्य करणार नाही. धनंजय देशमुख जे काही बोलले त्याला माझं समर्थन आहे. या प्रकरणात ज्यांची इन्वॉल्वमेंट येईल ते सगळे आतमध्ये जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे”, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.

“मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करायला आम्ही इथे आलेलो नाहीत. कुटुंबियांचं जे दु:ख होतं ते सांगितलं. संतोष देशमुख हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बुथप्रमुख आहे. नमिता मुंदडा यांचाही बुथप्रमुख आहे. कालच्या लोकसभेत ते पंकजा मुंडे यांचा बुथप्रमुख आहे. आमच्या भाजपचा बुथप्रमुख हरवला आहे. आमचा बुथप्रमुख गेला आहे. बुथरचनेला भाजपमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यापुढे कुणीही असेल, त्याला जावं लागेल. मी नाव घेणार नाही. पण जो कुणी असेल त्याला बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा या त्या गोष्टी नंतर”, असं सुरेश धस स्पष्ट म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे दोन मोठे निर्णय

“तपासातील पुरावे शंभर टक्के पोलिसांनी घेतले आहेत. ज्या गोष्टी मीडियात सांगितल्याने तपासात अडथळा येतील, अशा गोष्टी मी सांगणार नाही. पण देशमुख कुटुंबियांचा निर्णय असा दिला आहे की, संतोष देशमुख यांच्या पत्नीला लातूर जिल्ह्यात शासनात सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण संतोष देशमुख यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे”, अशी महत्त्वाची माहिती सुरेश धस यांनी दिली. “एसआयटीमध्ये बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसांत एसआयटीत बदल झालेला दिसेल”, अशी देखील माहिती सुरेश धस यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

सुरेश धस यांचा नवा गौप्यस्फोट

“मी नाही धनंजय देशमुख यांनी सीडीआरची मागणी केली आहे. मागणी करायची गरज काय, पोलीस तपासणी करणारच आहेत. कोण कुणाला काय बोललं, आका कुणाला काय बोललं, आकाचा आका कुणाला काय बोलला, किंवा हे जे सराईत गुन्हेगार आहेत, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, आंधळे इत्यादींनी फक्त खंडणी घेतली नाही तर दुसऱ्या मुकादमांच्या सुद्धा वसुली करण्याचे काम केलेलं आहे. हे ट्रॅक्टरचोर आहेत. ह्यांच्या ट्रॅक्टरचोरीचे व्हिडीओ कॉल पोलिसांच्या हाती लागले आहेत आणि आमच्याकडे ते उपलब्ध झाले आहेत. आम्ही पुरावा म्हणून देणार आहोत”, असं सुरेध धस म्हणाले.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.