Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदयनराजे भोसलेंचे मुख्यमंत्र्यांना 5 प्रश्न, वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणाची चर्चा

उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पाच प्रमुख प्रश्न उपस्थित केले. | Udayanraje Bhosale

उदयनराजे भोसलेंचे मुख्यमंत्र्यांना 5 प्रश्न, वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणाची चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पाच प्रमुख प्रश्न उपस्थित केल्याचे समजते.
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 1:30 PM

मुंबई: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhonsale) यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पाच प्रमुख प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. (BJP MP Udayanraje Bhosale meets CM Uddhav Thackeray at Varsha bunglow)

उदयनराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पाच प्रश्न

*जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का?

*जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ?

*ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ?

*महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल.

*MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही?

‘वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन’

राठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मध्यंतरी केले होते. राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. गेल्याच आठवड्यात उदयनराजेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजे भोसलेंचा इशारा

महाविकासआघाडीच सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातले पाहिजे. अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल. यापूर्वी मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले होते. मात्र, आता काय होईल हे सांगता येत नाही, असा गंभीर इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता.

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत. महाविकासआघाडी ही शरद पवार यांच्यामुळेच सत्तेत आहे. या सगळ्याची बांधणी त्यांनीच केली. त्यामुळे राज्य सरकारला सांगून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे, हेदेखील शरद पवार यांचेच काम आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या :

बंदूक तुमच्या हातात होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सोनिया गांधींच्या घराबाहेर नाना पटोले दिसताच उदयनराजेंनी गाडी थांबवली अन्….

(BJP MP Udayanraje Bhosale meets CM Uddhav Thackeray at Varsha bunglow)

मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे...
पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, यापुढे....
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले.
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?.
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले....
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.