राजकारणाच्या सर्व परिसीमा ओलांडत पंकजा ताई पोहोचल्या ब्रीच कँडी रुग्णालयात, भाऊ धनंजय मुंडे यांना म्हणाल्या….
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय.

नंदकिशोर गावडे, Tv9 मराठी, मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. धनंजय मुंडे यांचा चार दिवसांपूर्वी परळीत अपघात (Dhananjay Munde Aciident) झाला होता. या अपघातानंतर त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. धनंजय यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरु आहेत. धनंजय यांना आणखी काही दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी राहावं लागणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कालच धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भाजप नेत्या आणि धनंजय यांच्या बहीण पंकजा मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या रुग्णालयातील भेटीचे फोटो आणि व्हिडीओज ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागले आहेत. या व्हिडीओमध्ये धनंजय आपल्या ताईसोबत अपघात नेमका कसा झाला? याबाबतची माहिती देताना दिसत आहेत.



पंकजा यावेळी धनंजय यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. तर धनंजय आपल्यासोबत काय घडलं, आता आपली प्रकृती कशी आहे, याबाबत सविस्तर माहिती सांगताना व्हिडीओत दिसत आहेत.
परळीत धनंजय आणि पंकजा हे दोन्ही भाऊ-बहीण राजकीय आखाड्यात आमनेसामने आलेले असतात. दोन्ही भाऊ-बहिणीमध्ये राजकीय वैर आहे. पण जेव्हा प्रकृती संबंधित कुणाला काही अडचण आली, मुंडे कुटुंबावर संकट आलं तर हे दोन्ही भाऊ-बहीण एक होतात हे याआधीदेखील राज्याने पाहिलं आहे.
‘धनंजय मुंडे यांच्या 7-8 नंबरच्या बरगड्यांना फ्रॅक्चर’, अजित पवारांची माहिती
धनंजय मुंडे यांना अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना माहिती दिली होती.
“डॉक्टरांनी पूर्णपणे तपासणी केलेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना थोडसं फ्रँक्चर झालंय. तरीदेखील आपण 24 तास लक्ष देऊ. त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आहे”, अशी माहिती अजित पवारांनी दिली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे.