जनतेची फसवणूक कराल, पण मंदिरातील देवाचे काय?; भाजपचा संजय राठोडांना सवाल

वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताची पोहरादेवी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. (bjp slams sanjay rathod over pooja chavan suicide case)

जनतेची फसवणूक कराल, पण मंदिरातील देवाचे काय?; भाजपचा संजय राठोडांना सवाल
संजय राठोड आपल्या पत्नीसोबत घरातून बाहेर पडले.
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 12:37 PM

मुंबई: वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताची पोहरादेवी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावरून भाजपने राठोड आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राठोड यांच्या स्वागतासाठी मंदिराबाहेर रेड कार्पेट अंथरले जात आहे. तुम्ही जनतेची फसवणूक कराल, पण मंदिरातील देवाचे काय?, असा सवाल भाजपने केला आहे. (bjp slams sanjay rathod over pooja chavan suicide case)

भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा सवाल केला आहे. एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी ज्यांची सातत्याने चौकशीची मागणी होत आहे व आत्महत्येनंतर अज्ञातवासात जाणारे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री. त्यांच्याच स्वागतासाठी मंदिराबाहेर ‘red carpet’ अंथरले जात आहे… जनतेची फसवणूक कराल….पण मंदिरातील देवाचे काय?, असा सवाल भाजपने केला आहे.

वाह रे बहाद्दर सरकार

संजय राठोडच्या पाठराखणीसाठी तिन्ही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची एकत्रितपणे चढाओढ पहायला मिळाली. हीच एकी भंडारा येथे भंडारा ११ निष्पाप बालक दगावली तेव्हा दिसली नाही. हिंगणघाटातील निर्भयाला सरकारी वचनाची पूर्तता करण्याबाबत ही एकी दिसली नाही. पण बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी मात्र हे तिन्ही पक्ष एकत्र येत आहेत. वाह रे बहाद्दर सरकार, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

राठोडांना मुख्यमंत्री पाठिशी घालत आहेत का?

एवढे दिवस झाले तरी पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात दबाव आणला जातोय का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांना पाठीशी घालतय का? असा प्रश्न पडतो, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

राठोड यांनी राजीनामा द्यावा

संबंधित मंत्री व सरकारचं वागणं संशयास्पद असून 15 दिवस समाजाच्या नागरिकांना हाताशी धरून दबाव तंत्र अवलंबल जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हे सर्व अनाकलनीय व घृणास्पद असून दोषारोप सिद्ध होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे. (bjp slams sanjay rathod over pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

Photo : 40 किमीपर्यंत भरगच्च ताफा, आर्णीजवळ आणखी एक गाडी वाढली, संजय राठोडांच्या ताफ्यात किती गाड्या?

PHOTO: नॉट रिचेबल संजय राठोड समोर आले तो क्षण

यंत्रणा अ‍ॅलर्ट! संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत; पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

(bjp slams sanjay rathod over pooja chavan suicide case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.