Big News Video : भाजप प्रवक्त्याच्या पैगंबरांबाबतच्या वक्तव्यानं वाद, नुपूर शर्मांना थेट शिरच्छेदाची धमकी
एवढच नाही तर हे संपूर्ण प्रकरण ट्विटर तसच सोशल मीडियावरही जोरदार चर्चिलं जातंय. त्यामुळे Ayesha हा ट्विटरवरही ट्रेंड होतोय. एवढच नाही तर #ArrestNupurSharma आणि ्रArrestZubair हे इतर दोन्ही ट्रेंडही याच घटनेसंबंधी आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत (Prophet) केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय. हा वाद इथपर्यंत पोहोचलाय की त्यांना आता थेट शिरच्छेदाची धमकी देण्यात आलीय. त्यांनी तशी तक्रारही दिल्ली पोलीस आयुक्तांकडे केलीय. एवढच नाही तर संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं ट्विटही नुपूर शर्मांनी पंतप्रधान (PM Modi) आणि पोलीसांना टॅग केलंय. नुपूर शर्मा या ज्ञानवापी मशिद विषयावरील एका टीव्ही डिबेट शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याच शोमध्ये एका मुस्लिम गेस्टला उत्तर देताना त्यांनी एक वक्तव्य केलं अन् त्याच वक्तव्यावरुन वाद होतोय. एवढच नाही तर हे संपूर्ण प्रकरण ट्विटर तसच सोशल मीडियावरही जोरदार चर्चिलं जातंय. त्यामुळे Ayesha हा ट्विटरवरही ट्रेंड होतोय. एवढच नाही तर #ArrestNupurSharma आणि #ArrestZubair हे इतर दोन्ही ट्रेंडही याच घटनेसंबंधी आहेत.
नुपूर शर्मा नेमक्या काय म्हणाल्या?
दिल्लीच्या नुपूर शर्मा ह्या पेशानं वकिल आहेत. भाजपच्या त्या राष्ट्रीय प्रवक्त्याही आहेत. त्या आक्रमक शैलीच्या म्हणूनच ओळखल्या जातात. त्यातल्या त्यात धार्मिक डिबेट असेल तर त्या आणखी आक्रमक होताना दिसतात. अशीच एक ज्ञानवापी संदर्भातली डिबेट टाईम्स नाऊ ह्या इंग्रजी वृत्तवाहिनीवर आयोजीत करण्यात आली होती. त्यात मुस्लिम गेस्टला उत्तर देताना नुपूर शर्मा थेट कुराण तसच मोहम्मद पैगंबरांबद्दल बोलल्या. तुम्ही तो वाद मुळातून पहाण्यासाठी व्हिडीओ पहावा.
Prime Time debates in India have become a platform to encourage hate mongers to speak ill about other religions. @TimesNow‘s Anchor @navikakumar is encouraging a rabid communal hatemonger & a BJP Spokesperson to speak rubbish which can incite riots. Shame on you @vineetjaintimes pic.twitter.com/lrUlkHEJp5
— Mohammed Zubair (@zoo_bear) May 27, 2022
मोहम्मद झुबेरनं काय केलं?
नुपूर शर्मांच्या ह्या वक्तव्यावर कुठल्याही राजकीय पक्षानं किंवा इतर कुणी मुख्य प्रवाहातल्या नेत्यानं प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पण अल्ट न्यूज ही जी फॅक्ट चेक करणारी संस्था आहे, त्याचे को फाऊंडर आहेत मोहम्मद झुबेर. त्यांनी नेमकं मोहम्मद पैगंबर, त्यांचं लग्न, 6 वर्षाची मुलगी, त्यातली लैंगिकता यावरचा नुपूर शर्मांचं वक्तव्य असणारी क्लिप ट्विटरवर टाकली. त्यानंतर ह्या वादाला आणखी हवा मिळाली. झुबेर ट्विटमध्ये म्हणतात- भारतात प्राईम टाईम डिबेट ह्या इतर धर्मांबद्दल चुकीचं बोलण्यासाठी प्लॅटफॉर्म झालेल्या आहेत. टाईम्स नाऊच्या नाविकाकुमार ह्या धार्मिक द्वेषाला हवा देतायत आणि भाजपच्या प्रवक्त्या जे बोलतायत त्यानं दंगलीही घडू शकतात. शेम ऑन यू विनित जैन. झुबेर यांनी हे ट्विट टाईम्स नाऊ, टाईम्स ग्रुपचे मालक विनित जैन, नाविकाकुमार यांना टॅग केलंय.
.@CPDelhi please note wholly & solely @zoo_bear is responsible who instead of ‘fact-checking’ peddled a fake-narrative to vitiate the atmosphere, cause communal disharmony & cause communal & targeted hatred against me & my family
2/2@narendramodi @AmitShah @JPNadda @blsanthosh
— Nupur Sharma (@NupurSharmaBJP) May 27, 2022
नुपूर शर्मांना धमकी
मोहम्मद झूबेर यांनी ती वादग्रस्त क्लिप ट्विट केल्यानंतर ट्विटरवर ती लगेच व्हायरल झाली. ट्रेंडही सुरु झाल्या. दोन्ही बाजूनं प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. नुपूर शर्मांनी मग ट्विट करत थेट दिल्ली पोलीसांकडे झुबेरची तक्रार केली. तेच ट्विट नुपूर शर्मांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केलंय. नुपूर शर्मा तक्रारीत म्हणतात-मी आणि माझ्या कुटुंबियांविरोधात रेप, ठार मारण्याची धमकी तसच शिरच्छेदाच्या धमकीचे बाँब पडतायत. त्यात माझी बहिण, आई, वडील आणि मी स्वत: आहे. हे मी स्वत: दिल्ली पोलीसांना कळवलेलं आहे. जर मी किंवा माझ्या कुटुंबियांना काही झालं तर त्याला संपूर्णपणे मोहम्मद झुबेर हा जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. फॅक्ट चेकिंगच्या नावाखाली तो खोटं नॅरेटीव्ह तयार करतो, त्यातून वातावरण गढूळ होतं, धार्मिक द्वेष तयार होतो. मी आणि माझं कुटूंब टार्गेट केलं जातंय.
#ArrestNupurSharma pic.twitter.com/xmvypcPqcN
— Raza Academy (@razaacademyho) May 27, 2022
रझा अकादमीचे ट्विटच ट्विट
नुपूर शर्मा यांनी दिल्ली पोलीसांकडे रितसर तक्रार दाखल केलीय. त्यानंतर मोहम्मद झुबेरला अटक करा अशी मागणी ट्विटरवर, सोशल मीडियावर केली जातेय. त्यातूनच #arrestZubair हा ट्रेंड होतोय. तर दुसरीकडे मुंबईतल्या वादग्रस्त रझा अकादमीने नुपूर शर्मांविरोधात ट्विटरवर मोर्चा उघडलाय. त्यातून #ArrestNupurSharma ट्रेंड होतोय. रझा अकादमीनं ट्विट दिल्ली पोलीस तसच मुंबई पोलीसांना ट्विट टॅग करत नुपूर शर्मांवर कारवाईची मागणी केलीय. रझा अकादमीचं ट्विट-
प्राइम टाइम की बहसें नफरत फैलाने वालों को दूसरे धर्मों के बारे में बुरा बोलने के लिए प्रोत्साहित करने का एक मंच बन गई हैं। Times Now के एंकर एक कट्टर सांप्रदायिक नफरत फैलाने और भाजपा प्रवक्ता को बकवास बोलने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं जो दंगे भड़का सकते हैं।#ArrestNupurSharma
— Raza Academy (@razaacademyho) May 28, 2022
नुपूर शर्मा त्यांचं वक्तव्य, त्यांना आलेल्या धमक्या, ज्ञानवापी प्रकरण यावर पुढचे काही दिवस राजकारण होऊ शकतं. पोलीस नेमकी कुणाविरोधात कारवाई करतात हेही पाहणे औत्सुक्याचं आहे.