“पक्ष संपला तरी चालेल पण ‘मविआ’मध्येच ठाकरे राहतील”; भाजपने ठाकरे गटाची मजबूरी सांगितली…

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. महाविकास आघाडीत वाचाळवीर तयार झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे मत त्यांच्या पक्षातील कोणताही नेता ऐकत नाही असा टोला लगावत त्यांच्या पक्षात कुणी मनाने एक नाहीत.

पक्ष संपला तरी चालेल पण 'मविआ'मध्येच ठाकरे राहतील; भाजपने ठाकरे गटाची मजबूरी सांगितली...
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 7:32 PM

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून आता जागावाटपांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युती, इतर पक्षांची आघाडी-बिघाडीचा प्रश्न चर्चेला जात जात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावरून चाललेल्या चर्चेतील बिघाडीचा सूर त्यांनी दाखवून दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत ज्या वेळी जागावाटपाचा प्रश्न सुरु होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना दोन जागा दिल्या तरी ते मविआमध्येच राहतील कारण त्यांना पक्ष संपला तरी चालेल पण मविआसोबतच ते राजकीय प्रवास करतील असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंसोबत एवढी तडजोड करणार आहेत की, फक्त किंचित सेनादेखील राहणार नाही असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

तर दुसरीकड चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाजपविषयी बोलताना सांगितले की, आमच्यामध्ये जागा वाटपावरून नाराजी दिसणार नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र त्यांची सेना किंचित राहणार असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

राज्यात ज्या ज्या भागात दंगल झाली त्यावरून विरोधकांनी भाजपला कारणीभूत ठरवले आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, भाजपला दंगली वरुन राजकारण करण्याची अजिबात गरज वाटत नाही.

धार्मिक आधारावर मत मागणे आणि सत्तेत येणे ही आमची विचार धारा नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे.

ज्या काँग्रेसकडून ही टीका केली जाते त्याच काँग्रेसच्या रक्तात ही गोष्ट असल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. मुस्लिम मागासवर्गीय समाजाला भडकवण्याचं काम काँग्रेसने 65 वर्षे करत राहिले आहे असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला आहे.

यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली जाते ही खरं तर वेदनादायक गोष्ट आहे. हा व्हिडीओ डिलीट केला पाहिजे आणि त्यावर तातडीने काँग्रेसने माफी मागितली पाहिजे असं सांगत जर व्हिडीओ डिलीट केला नाही तर आंदोलन होणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. महाविकास आघाडीत वाचाळवीर तयार झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे मत त्यांच्या पक्षातील कोणताही नेता ऐकत नाही असा टोला लगावत त्यांच्या पक्षात कुणी मनाने एक नाहीत.

त्यामुळे केवळ भाजपाला रोखण्यासाठी ते एकत्र आले आहेत, विचाराने एकत्र आले नाहीत असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला आणि शरद पवार यांना लगावला आहे.

त्यांच्या या लढाईमध्ये नरेंद्र मोदींचेच वादळ मोठे आहे, त्यामुळे हे तिन्ही पक्षांचा एकत्र आले तरी 51 टक्क्यांची लढाई आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.