BJP vs Shiv Sena : खुर्ची उचलण्यावरून भाजपा-शिवसेनेत ‘सामना’, भातखळकरांच्या ट्विटवर सामंत म्हणाले…
शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी(NCP)नं करून ठेवलीय, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त शिवसेनेची चांगली परिस्थिती नाही, असे भाजपा आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) म्हणाले आहेत. यापेक्षा संजय राऊत यांनी एकदाच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा म्हणजे यूपीए(UPA)मध्ये जाण्याचं कष्टही वाचेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर शिवसेने(Shiv Sena)नंही चोख प्रत्त्युत्तर भाजपाला दिलंय.
मुंबई : संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) खुर्ची उचलताना कसलंही आश्चर्य वाटल नाही. कारण शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी(NCP)नं करून ठेवलीय, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त शिवसेनेची चांगली परिस्थिती नाही, असे भाजपा आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) म्हणाले आहेत. कधी राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना भेटणं, कधी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेण्यासाठी धावपळ करणं, यापेक्षा संजय राऊत यांनी एकदाच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा म्हणजे यूपीए(UPA)मध्ये जाण्याचं कष्टही वाचेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर शिवसेनेनंही चोख प्रत्त्युत्तर भाजपाला दिलंय.
शिवसेनेचं प्रत्त्युत्तर अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केलेल्या ट्विटला शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिलंय. तो फोटो महाराष्ट्रातील राजकीय परंपरेचा आहे. एखाद्या देशातील वरिष्ठ नेता जे सर्वांचेच मार्गदर्शक आहेत, ज्यांचा सल्ला, मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi)देखील घेतात, अशा व्यक्तीसमोर उभं असताना त्यांना खुर्ची देणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची प्रथा-परंपरा आहे. राऊत साहेबांनी परंपरा जपण्याचा पारंपरिक प्रयत्न केला आहे. जे संस्कृती विसरले त्यांनी अशा पद्धतीचे ट्विट करणे योग्य आहे असे मला वाटत नाही, असा प्रतिटोला अतुल भातखळकर यांना लगावलाय.
काय होतं भातखळकरांचं ट्विट? धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते गेले, तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते, की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवार(Sharad Pawar)च.