मुंडे कुटुंबाचं राजकारणातील अस्तित्व संपवण्यासाठी दिल्लीतून…; संजय राऊत यांचा मोठा दावा काय?

घर काढून घेतलं तरी राहुल गांधी देश-विदेशात लढत आहेत. देशाची स्थिती आहे, त्यावर आम्ही बोलत असू तर तो अपमान नाही. तुम्हीही 2014मध्ये तेच केलं आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

मुंडे कुटुंबाचं राजकारणातील अस्तित्व संपवण्यासाठी दिल्लीतून...; संजय राऊत यांचा मोठा दावा काय?
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 11:36 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पार्टीच्या कार्यक्रमात संबोधित करताना भाजप माझा पक्ष आहे. पण मी भाजपची थोडीच आहे, असं विधान केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोरच पंकजा मुंडे यंनी हे विदान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंकजा यांच्या या विधानाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा यांनी जाणूनबुजून हे विधान केलं का? त्या वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत काय? पक्षात त्यांचं खच्चीकरण सुरू आहे काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाचं राजकारणात अस्तित्व राहु नये म्हणून दिल्ली आणि महाराष्ट्रात हालचाली सुरू आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत. पण भाजप त्यांना आपलं मानत नाही. असं त्यांना म्हणायचं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. भाजपला आजचे दिवस गोपीनाथ मुंडे यांनी दाखवले. त्यांच्यासोबत बहुजन समाजातील नेते होते. बहुजन समाजातील या नेत्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला. शिवसेनेशी युती केली, हा पक्ष सत्ताधारी केला. त्या मुंडे कुटुंबाचं अस्तित्व राजकारणात राहू नये यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

संन्यास घ्यावा

पंकजा यांचा पराभव का आणि कसा झाला हे सांगण्याची गरज नाही. तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. त्याविषयी सर्व जाणून आहेत. गोपीनाथ मुंडे असते तर भाजप-शिवसेना युतीला वेगळी दिशा मिळाली असती. आज जे चित्र आहे ते दिसलं नसतं. पण मुंडे नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची राजकारणात वाताहत केली जात आहे. ते मला स्पष्ट दिसतंय. अर्थात कुटुंबातील नेत्यांनी हिंमतीने, साहसाने निर्णय घेण्याची गरज असते. परिणामाची पर्वा काय होईल, परिणाम काय होतील याची पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात, तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता. नाही तर तुम्ही राजकारण संन्यास घ्यावा. आमच्यावर अन्याय होतो अशा प्रकारच्या रडगाण्याला कुणीही विचारत नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

बिहारला जाणार

बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. 12 जूनला नितीश कुमार यांनी सर्व मोठ्या नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. जे लोक भाजप सोबत नाही, ज्यांना 2024मध्ये बदल हवा आहे, अशा सर्व देशभक्त राजकीय पक्षांना त्यांनी निमंत्रण दिलं आहे. आम्ही पटणाला जाणार असल्याचा विचार करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांचं कौतुक

राहुल गांधी यांना अमेरिकेत मोठा रिस्पॉन्स मिळत आहे. त्यांना ऐकायला येणारे लोक भाड्याचे तट्टू नाहीत. राहुल गांधी फॉर्मात आहे. त्यांची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पूर्वी सचिन आणि सेहवाग असायचे तसे राहुल गांधी फॉर्मात आहेत. राहुल गांधी यांचे घर काढून घेतलं. पासपोर्ट काढून घेतला. तरीही एक नेता देश-विदेशात लढत आहे. संकट ही संधी असते असं त्यांना वाटतं. ते बरोबर आहे, असं त्यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.