राज्यात कोण किती जागा लढणार, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले जागा वाटप

loksabha election 2024 | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर 2024 ची लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता महाराष्ट्रात महायुतीचा जागा वाटपचा फार्मूला ठरला आहे. हा फार्मूला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केला आहे.

राज्यात कोण किती जागा लढणार, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले जागा वाटप
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 11:29 AM

गजानन उमाटे, मुंबई, दि. 26 नोव्हेंबर 2023 | सध्या पाच राज्याची विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीस लोकसभेची सेमीफायनल म्हटले जात आहे. या सेमीफायनलचे निकाल ३ डिसेंबर रोजी येणार आहे. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुतीकडून तयारी सुरु आहे. महायुतीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तीन पक्षांत कोण किती जागा लढवणार आहे, हे निश्चित झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यानुसार राज्यात भाजप २६ लोकसभेच्या जागा लढवणार आहे. तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना २२ जागेवर आपले उमेदवार देणार आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला ठरला आहे. त्यानुसार भाजप २६ जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी २२ जागांवर लढतील. जागावाटपाचा हा फॉर्मूला निश्चित झाला असून त्यावर लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे,” देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला फार्मूला शिवसेना आणि राष्ट्रवादी मान्य करणार का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान राज्यात आरक्षणावरुन तणाव निर्माण झाला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. ओबीसी आरक्षणास धक्का लागणार नाही, हे त्यांनी या मुलाखातीत पुन्हा स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

सर्व्हेनंतर घेतला निर्णय

महायुतीचा सर्व्हे नुकताच झाला आहे. भाजपचा वेगळा सर्व्हे राज्यात झाल्या आहे. गेल्यावेळी भाजप २५ जागा लढवल्या होत्या. त्यातील २३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. सर्व्हेनुसार ज्या ठिकाणी जो पक्ष जिंकून येईल, त्या ठिकाणी त्या पक्षाला संधी दिली जाणार आहे. विदर्भात भाजप मजबूत आहे. त्या ठिकाणी भाजप जागा लढवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी तर कोकण आणि मुंबईत शिवसेनेला जास्त जागा देण्यात येणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.