Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai child death : मुंबईत चार दिवसात चार बालकांच्या मृत्यूने खळबळ; भाजप खासदार कोटक पोलिसात तक्रार दाखल करणार

रुग्णालयात नेमकं काय झालं? ज्यामुळे बालकांचा मृत्यू झाला असा सवाल उपस्थित होतोय. ही घटना गंभीर असून यासंदर्भात संबंधित दोषी व्यक्तींविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले आहे.

Mumbai child death : मुंबईत चार दिवसात चार बालकांच्या मृत्यूने खळबळ; भाजप खासदार कोटक पोलिसात तक्रार दाखल करणार
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 4:34 PM

मुंबई : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहामध्ये एन आयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. गेल्या चार दिवसात चार बालकांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . कुठल्यातरी इन्फेक्शनमुळे या मुलांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आलं, मात्र नेमके कारण अजूनही पालिकेला कळाले नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

भाजप पोलीस तक्रार दाखल करणार

अद्यापही पालिका प्रशासनाला नेमकं इन्फेक्शन कशामुळे झालं याचा शोध घेता आला नाही. त्यामुळे या रुग्णालयात नेमकं काय झालं? ज्यामुळे बालकांचा मृत्यू झाला असा सवाल उपस्थित होतोय. ही घटना गंभीर असून यासंदर्भात संबंधित दोषी व्यक्तींविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे भाजपकडून पालिकेविरोधत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पुन्हा पेंग्विनचा उल्लेख करत भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

सत्ताधारी पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गूल

या घटनेवरून भारतीय जनता पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. एनआयसीयूमध्ये जीवघेणे इन्फेक्शन होतेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गूल सत्ताधाऱ्यांना बालमृत्यूने शोकाकूल असणाऱ्या मुंबईकरांचे सोयरसुतक नसून पालिकेची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. या बालमृत्यू प्रकरणामुळे पुन्हा रुग्णालय प्रशासन आणि महापालिका प्रश्नांच्या फेऱ्यात आली आहे. त्यामुळे पालिकेकडून हे प्रकरण कसे हातळले जाते? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी बीडीडी चाळीतील प्रकरणावरूनही भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला चांगलेच धारेवर धरले होते आणि आता पुन्हा बालमृत्यू प्रकरणावरून भाजप पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालिकेसमोरील पेचही वाढला आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्याचे आव्हान आता मुंबई महापालिका आणि आरोग्य यंत्रणेसमोर असणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.