महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवा, भाजपच्या महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या महिला शिष्टमंडळाने आज (13 सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या महिला शिष्टमंडळाने आज (13 सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने साकीनाका बलात्कार प्रकरण तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर राज्यपाल यांच्याकडे पत्राद्वारे अनेक मागण्या केल्या. (bjp women leaders visited governor bhagat singh koshyari demands strict implementation of women protection law in maharashtra state)
महिलांच्या सुरक्षाविषयक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी
भाजपच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. गेल्या काही दिवसामध्ये महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांविषयी या शिष्टमंडळाने कोश्यारी यांना माहिती दिली. तसेच सरकारने महिलांच्या सुरक्षाविषयक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीदेखील राज्यपालांकडे केली. तसेच महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू केला जावा, अशा मागणीचे पत्रही भाजपच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांना दिले.
सामनाच्या अग्रलेखातून तालिबानी वृत्ती- चित्रा वाघ
दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखावर टीका करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना घेरलं. “सामनाच्या अग्रलेखातून जे मुद्दे मांडण्यात आले त्यातून तालिबानी वृत्ती दिसते. हाथरस किंवा कठूआ बलात्काराच्या घटनांचं कोणीही समर्थन करत नाही. पण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेविषयीच्या संवेदनशील मुद्द्यावरदेखील राजकरण केलं जात आह, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
संजय राऊतांना कस कळलं की एकच आरोपी आहे ?
तसेच पुढे बोलताना संजय राऊत सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त झाले आहेत, असं दिसतंय. राऊत म्हणतात एक आरोपी साकिनाका प्रकरणात अटक आहे. अजून तपास पूर्ण झाला नाही. संजय राउतांना कस कळलं की एकच आरोपी आहे ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.
इतर बातम्या :
‘बार्टी’च्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडणार नाही, बडोलेंच्या टीकेनंतर धनंजय मुंडेंचा दावा https://t.co/4csnSCdsy8 @dhananjay_munde @NCPspeaks @AjitPawarSpeaks @OfficeofUT @RajkumarBadoleB #dhananjaymunde #BARTI #RajkumarBadole #MahavikasAghadi
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
(bjp women leaders visited governor bhagat singh koshyari demands strict implementation of women protection law in maharashtra state)