BJP | भाजपा कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्ध रॅपर गायकाचे पोस्टर का फाडले? काय इशारा दिलाय?

BJP | 'या' प्रसिद्ध रॅपर गायकाविरोधात भाजपा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. थेट कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सह पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलय. भाजपा कार्यकर्ते इतके आक्रमक होण्यामागे काय कारण आहे?

BJP | भाजपा कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्ध रॅपर गायकाचे पोस्टर का फाडले? काय इशारा दिलाय?
Shubhneet Singh
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 8:39 AM

मुंबई : प्रसिद्ध कॅनेडियन रॅपर गायक शुभ उर्फ शुभनीत सिंग विरोधात भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. निषेध म्हणून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कॅनेडियन गायिका शुभचे पोस्टर फाडले. शुभ उर्फ शुभनीत सिंगचा कॉर्डेलिया क्रूझवर शो आयोजित करण्यात आला आहे. या विरोधात आज भाजयुमो मुंबईच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांना निवेदन दिलं. खलिस्तान समर्थक गायक शुभनीत सिंग यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि त्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली. याशिवाय शोचे आयोजक टीम इनोव्हेशन, परसेप्ट लिमिटेड आणि कॉर्डेलिया क्रूसेस यांना शो रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

शुभनीत सिंग विरोधात भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते इतके आक्रमक का झालेत? त्यामागे कारण आहे. शुभने सोशल मीडियाद्वारे खलिस्तानचं उघडपणे समर्थन केलं आहे. अलीकडेच शुभने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे भारताचा विकृत नकाशाही दाखवला होता आणि आता मुंबईत त्याच्यासाठी एका मैफिलीचे आयोजन करण्यात आलं आहे. भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, “खलिस्तान समर्थक, भारताच्या एकतेचे आणि अखंडतेचे शत्रू यांना भारतात स्थान नाही. देश तोडण्याचा कट रचणाऱ्या कॅनेडियन गायक शुभला आम्ही भारतात परफॉर्म करू देणार नाही” “आता आम्ही शांततेने आयोजकांना आणि मुंबई पोलिसांना कार्यक्रम रद्द करण्यासाठी निवेदन दिले असून, योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करू” असा इशारा तेजिंदर सिंग तिवाना यांनी दिला. शुभ सोशल मीडियावर किती लाख फॉलोअर्स?

कॅनडाचा रहिवाशी रॅपर शुभ याने भारत सरकार आणि देशाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल FRI नोंदवावा अशी एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे. “शुभचे सोशल मीडियावर 10 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यात भारतातील तरुण देखील त्याच्याशी जोडलेले आहेत. अलीकडे 23 मार्च 2023 रोजी शुभने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर जम्मू-काश्मीर आणि पंजाबशिवाय भारताचा नकाशा पोस्ट केला आणि “पंजाबसाठी प्रार्थना” नावाने कथा म्हणून आणखी एक पोस्ट केली. हे पूर्णपणे भारताच्या अखंडतेच्या विरोधात आहे. अशा गद्दारांना आपल्या देशात स्थान नाही. आणि अशा लोकांवर FIR नोंदवून कडक कारवाई करावी अशी आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे” असं तिवाना म्हणाले

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....