तब्बल 93 वर्षांनी दादरमधील शिवाजी पार्कचं नाव बदललं
दादरमधील शिवाजी पार्कचं नाव बदलण्यात आलं आहे (BMC changed Shivaji Park name).

मुंबई : दादरमधील शिवाजी पार्कचं नाव बदलण्यात आलं आहे (BMC changed Shivaji Park name). शिवाजी पार्कचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं बदलण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्कचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कचं नाव 93 वर्षांनंतर बदलण्यात आलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शिवाजी पार्क अशी या पार्कची ओळख आहे (BMC changed Shivaji Park name).
शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर पश्चिम या भागामध्ये आहे. हे मैदान लोकप्रिय स्थळ आहे. शिवसेना, मनसे आणि भाजप तसेच विविध पक्षांचे विविध कार्यक्रम याच मैदानावर होता. याशिवाय अनेक शासकीय कार्यक्रमदेखील या मैदानावर होतात.
मुंबई महापालिकेनं 1925 साली शिवाजी पार्क मैदान जनतेसाठी खुलं केलं होतं. या मैदानाचं मूळ नाव माहिम पार्क असं होतं. या मैदानावर एका बाजूला शिवाजी माहाराजांचा पुतळा आहे. हा पुतळा 1966 साली उभारण्यात आला होता.
शिवाजी पार्कचं नाव ‘शिवतीर्थ’ व्हावं, शिवसेनेची मागणी
शिवाजी पार्कसोबत शिवसेनेचा जवळचा संबंध आहे. ‘शिवाजी पार्क’चं नाव शिवतीर्थ व्हावं, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, आता मुंबई महापालिकेनं या मैदानाचं नाव छत्रपती शिवाजी पार्क असं बदललं आहे.
‘शिवतीर्थ’ असा उल्लेख आचार्य अत्रेंचा
शिवाजी पार्क येथे लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. शिवाजी पार्कचा ‘शिवतीर्थ’ असा उल्लेख सर्वात अगोदर आचार्य अत्रे यांनी केला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ दरम्यान त्यांनी शिवाजी पार्कचा उल्लेख ‘शिवतीर्थ’ असा केला होता. शवाजी पार्कवर अत्रेंची सभा असली की, ‘शिवतीर्थावर अत्रेंची जाहीर सभा’, असे बॅनर्स असायचे. त्यानंतर शिवसेनेने या मैदानाचा उल्लेख ‘शिवतीर्थ’ असा केला. याशिवाय या मैदानाचं नाव शिवतीर्थ व्हावं, अशीदेखील मागणी शिवसेना करत आली आहे.