सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई; अवघ्या 15 दिवसात पालिकेकडून काम पूर्ण

रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गावर येवू नये, यासाठी ही स्वच्छ्ता अतिशय महत्वाची ठरते. (BMC Clean Central railway Nala Clean)

सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई; अवघ्या 15 दिवसात पालिकेकडून काम पूर्ण
mumbai bmc rail nala clean
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 3:09 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, उपनगरीय लोह मार्गांवर, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंड दरम्यान रुळांखालील 15 ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिकेला याबाबतची विनंती केली होती. या विनंतीनंतर मुंबई महापालिकेने अवघ्या 15 दिवसात ही काम पूर्ण केली आहेत. (BMC Clean Central railway Culverts Nala Clean In 15 Days)

पावसाळ्यापूर्वी निरनिराळ्या प्रकारची कामे 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी निरनिराळ्या प्रकारची कामे संबंधित खात्यांमार्फत पूर्ण करण्यात येतात. मुंबई महानगर क्षेत्रातील नाल्यांमधील गाळ काढून स्वच्छ्ता करण्याची कामे प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका करते. त्याचप्रमाणे तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छता, रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील (कल्व्हर्ट) गाळ काढण्याची कामे ही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गावर येवू नये, यासाठी ही स्वच्छ्ता अतिशय महत्वाची ठरते.

मुंबईतील रेल्वे मार्गांवर सुमारे 116 कल्व्हर्ट

मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे 116 कल्व्हर्ट आहेत. यापैकी पश्चिम रेल्वे मार्गावर 41, मध्य रेल्वे मार्गावर 53 आणि हार्बर रेल्वे मार्गावर 22 कल्व्हर्ट आहेत. यातील बहुतांश खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत. नाल्यांच्या खुल्या प्रवाह मार्गातील गाळ काढणे तुलनेने सोपे असते. तर बंदिस्त प्रवाह मार्गातील गाळ काढून स्वच्छ्ता करणे आव्हानात्मक असते.

गाळ काढून स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वेची विनंती 

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोह मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण 18 ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मार्ग (कल्व्हर्ट) आहेत. तेथील गाळ काढून स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिका प्रशासनाला अलीकडे झालेल्या पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत विनंती केली. त्यावेळी मध्य रेल्वेकडे या बंदिस्त प्रवाह मार्गाची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री नाही. त्यामुळे महानगरपालिकेला रेल्वे हद्दीत हे काम करावे, अशी विनंती केली. यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी रेल्वे प्रशासनाची विनंती मान्य केली.

त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याने तातडीने कार्यवाही सुरू केली. पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने गाळ काढणारे फायरेक्स संयंत्र तैनात करण्यात आले. तसेच यात 18 पैकी 15 ठिकाणी गाळ काढून स्वच्छ्ता पूर्ण करण्यात आली. तर संयंत्र पोहोचू न शकणाऱ्या तीन ठिकाणी मनुष्यबळाच्या साह्याने हे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.

या 15 ठिकाणची ही सर्व कामे पूर्ण करताना त्यावर योग्य देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेचे आणि रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. दिनांक 19 मे 2021 रोजी सुरू झालेली ही कार्यवाही दिनांक 4 जून 2021 रोजी पूर्ण झाली आहे. म्हणजेच अवघ्या 15 दिवसात महानगरपालिकेने ही अतिरिक्त जबाबदारी देखील पार पाडली आहे. (BMC Clean Central railway Culverts Nala Clean In 15 Days)

संबंधित बातम्या : 

मुंबईत अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी गँगरेप, सहा इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सना अटक

राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन ऐकताना, त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो: जयंत पाटील

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.