मुंबईत लग्‍न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये ‘हे’ नियम पाळणं बंधनकारक, अन्यथा गुन्‍हा दाखल होणार

कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांमध्ये रुग्‍णसंख्‍या वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने सतर्क झालीय.

मुंबईत लग्‍न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये 'हे' नियम पाळणं बंधनकारक, अन्यथा गुन्‍हा दाखल होणार
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 7:34 PM

मुंबई : कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांमध्ये रुग्‍णसंख्‍या वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने सतर्क झालीय. मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला तसे आदेश दिलेत. तसेच जे पालिकेच्या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. यानुसार आता मुंबईतलग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम घेताना पालिकेच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे (BMC Commissioner Iqbal Chahal declared directions to prevent Corona infection in Mumbai) .

“वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करावेत. मास्‍कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये 300 मार्शल्‍स नेमावेत. तसेच मुंबईतील मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्‍ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्‍यात,” यासह विविध सूचना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी केल्‍या आहेत.

“कोविड-19 अर्थात कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाच्‍या नवीन विषाणूने जगातील काही देशांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईसह महाराष्‍ट्रात कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण वेगाने सुरु आहे. असं असतानाच मागील काही दिवसांत कोविड रुग्‍णांची संख्‍या पुन्‍हा वाढू लागल्‍याने मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्‍याचे निर्देश दिलेत.

पालिका प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना?

  • पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळणाऱया इमारती करणार प्रतिबंधीत (सील)
  • होम क्‍वारंटाईन केलेल्‍या नागरिकांच्‍या हातावर मारणार शिक्‍के
  • विना मास्‍क रेल्‍वे प्रवास करणाऱयांवर कारवाईसाठी नेमणार ३०० मार्शल
  • विना मास्‍क फिरणाऱया नागरिकांवर कारवाईसाठी मार्शल्‍सची संख्‍या होणार दुप्‍पट, दररोज २५ हजार जणांवर कारवाईचे लक्ष्‍य
  • मंगल कार्यालये, क्‍लब, उपहारगृहं इत्‍यादी ठिकाणी धाडी टाकण्‍याच्‍या सूचना
  • ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्‍थात्‍मक विलगीकरणात
  • रुग्‍ण वाढत असलेल्‍या विभागांमध्‍ये तपासण्‍यांची संख्‍या वाढवणार

या पार्श्‍वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी आज (18 फेब्रुवारी 2021) महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त तसेच संबंधित अधिकारी यांच्‍यासमवेत दूरदृश्‍य प्रणाली (व्हिडिओ कॉन्‍फरन्‍स) द्वारे बैठक घेतली. त्‍यावेळी आयुक्‍त चहल यांनी परिस्थितीचा आढावा घेत यंत्रणेला आवश्‍यक ते निर्देश दिले.

इकबाल सिंह चहल म्‍हणाले, “जून-जुलै 2020 मधील स्थितीच्‍या तुलनेत आजही कोविड 19 संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्‍ण वाढत असल्‍याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्‍यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड 19 प्रतिबंधात्‍मक निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे. कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्‍यास अधिक कठोरपणे कारवाई करुन वेळीच संसर्गाला अटकाव होणे आवश्‍यक आहे.

आयुक्‍तांनी केलेल्या सूचना खालीलप्रमाणेः

1. लक्षणे आढळत नसलेल्‍या बाधित (असिम्‍प्‍टोमॅटिक) रुग्‍णांना घरी विलगीकरण (होम क्‍वारंटाईन) करण्‍यात येते. अशा रुग्‍णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत. तसेच त्‍यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्‍यक्तिंना दिवसातून 5 ते 6 वेळा दूरध्‍वनीवर संपर्क साधून ते घरी असल्‍याची खातरजमा करावी. बाधित व्‍यक्तिंची योग्‍य माहिती ठेवून त्‍यांच्‍या नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्तिंचे विलगीकरण करावे. असिम्‍प्‍टोमॅटिक रुग्‍णाचा घरातील विलगीकरण (होम क्वारंटाईन) कालावधी पूर्ण होण्‍याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्‍याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्‍या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल करण्‍याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्‍णांना सक्‍तीने संस्‍थात्‍मक विलगीकरण (इन्‍स्‍ट‍िट्यूशनल क्‍वारंटाईन) करावे.

2. ज्‍या रहिवासी इमारतींमध्‍ये पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळतील, अशा निवासी इमारती प्रतिबंधित (सील) करण्‍यात येतील.

3. लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्‍लब्‍ज, नाईट क्‍लब्‍ज, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्‍कचा वापर बंधनकारक आहे. मास्‍कचा वापर होत नसल्‍याचे आढळल्‍यास आणि 50 पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास संबंधित व्‍यक्तिंना दंड करण्‍यासोबत त्‍या-त्‍या ठिकाणच्‍या आस्‍थापनांवर, व्‍यवस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात यावेत.

4. लग्‍नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करावी. दररोज अशाप्रकारच्‍या किमान 5 जागांवर धाड टाकून तपासणी करावी. तिथे कोणत्‍याही नियमांचे उल्‍लंघन झालेले असेल तर दंडात्‍मक कारवाई करुन लग्‍नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्‍यवस्‍थापनांवर देखील गुन्‍हे दाखल करावेत.

5. मास्‍कचा योग्‍यरित्‍या उपयोग न करणाऱया तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱया नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी मुंबईत सध्‍या कार्यरत असलेल्‍या 2,400 मार्शल्सची संख्‍या दुपटीने वाढवून ती 4,800 इतकी करावी. विना मास्‍क फिरणाऱ्यांवर जरब बसवणे आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने सध्‍या होत असलेली सरासरी 12 हजार 500 नागरिकांवरील कारवाईची संख्‍या वाढवून दररोज संपूर्ण मुंबईत मिळून किमान 25 हजार नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात यावी.

6. मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर 100 यारितीने एकूण 300 मार्शल्‍स नेमून विनामास्‍क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करावी.

7. विनामास्‍क फिरणाऱयांवर कारवाई करण्‍यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्‍यात येत असून पोलीसदेखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करु शकतील.

8. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये आदी‍ ठिकाणी आवश्‍यकतेनुसार महानगरपालिकेच्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करुन त्‍यांना विना मास्‍क फिरणाऱयांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.

9. सर्वधर्मिय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे तेथे पालन होत असल्‍याबाबत लक्ष ठेवण्‍यात येईल. विना मास्‍क फिरणे, 50 पेक्षा अधिक व्‍यक्तिंनी एकाचवेळी एकत्र येणे, अशा नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास तेथेही कारवाई करण्‍यात येईल.

10. खेळाच्‍या मैदानांवर व उद्यानांमध्‍ये देखील विना मास्‍क आढळणाऱयांवर कारवाई करण्‍यात येईल.

11. कोविड बाधित रुग्‍णांची संख्‍या अधिक असलेल्‍या विभागांमध्‍ये मिशन झिरोच्‍या धर्तीवर कार्यवाही सुरु करावी. ज्‍या विभागांमध्‍ये नवीन रुग्‍ण मोठ्या संख्‍येने आढळून येत आहेत, तेथे एरिया मॅपिंग करुन, त्‍या क्षेत्रांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त संख्‍येने चाचण्‍या करण्‍यात याव्‍यात. तसेच अशा परिसरांमध्‍ये प्रति रुग्‍णामागे किमान 15 नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती (हायरिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट) शोधून त्‍यांना विलगीकरणात ठेवावे.

12. झोपडपट्टी, अरुंद वस्‍ती, दाट वस्‍तींमध्‍ये बिगरशासकीय संस्‍थांच्‍या मदतीने आरोग्‍य तपासणी शिबिरांचे आयोजन करुन संशयितांची तपासणी करावी. फिरत्‍या दवाखान्‍यांच्‍या (मोबाईल व्‍हॅन) माध्‍यमातून रुग्‍ण शोध मोहीम सुरु ठेवावी. चाचण्‍या कराव्‍यात.

13. प्रत्‍येक विभाग कार्यालयाच्‍या हद्दीमध्‍ये हाय रिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट व्‍यक्तिंसाठी कोरोना काळजी केंद्र 1 आणि लक्षणे नसलेल्‍या बाधितांसाठी कोरोना काळजी केंद्र 2 असे दोन्‍ही संवर्गातील प्रत्‍येकी किमान एक केंद्र कार्यान्वित ठेवावे.

14. भव्‍य कोविड उपचार केंद्र (जम्‍बो सेंटर्स) मधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्‍णशय्या, ऑक्सिजन रुग्‍णशय्या यांची पुरेशी उपलब्‍धता ठेवावी, असेही आयुक्‍तांनी नमूद केले.

15. बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्‍णालयांतून कोविड रुग्‍ण, रुग्‍णशय्या व इतर आवश्‍यक माहिती दर तासाने संकलित करुन ती माहिती डॅशबोर्डच्‍या माध्‍यमातून आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन खात्‍याने अद्ययावत करावी.

16. केंद्र सरकारच्‍या नियमावलीप्रमाणे, आता ब्राझिलमधून भारतात येणाऱया प्रवाशांनाही संस्‍थात्‍मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱ्या प्रवाशांना सक्‍तीने 7 दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍याचा निर्णय बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्‍याची अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली आहे.

हेही वाचा :

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची भीती, विनामास्क प्रवाशांवर रेल्वेतही कारवाई

मुंबईत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 5 रुग्ण, संपर्कातील 40 जणांच्या पुन्हा चाचण्या

मुंबईला धोकादायक करणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात? वाचा महापौर काय म्हणतायत?

व्हिडीओ पाहा :

BMC Commissioner Iqbal Chahal declared directions to prevent Corona infection in Mumbai

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.