मुंबईकरांनो भाजीची चिंता मिटली, शेतकऱ्यांच्या बांधावरील भाजी थेट घरपोच मिळणार
बाजारातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 'भाजीची गाडी आपल्या दारी' हा नवीन उपक्रम सुरु करण्यात येणार (BMC Vegetable Home Delivery) आहे.
मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बाजारातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ‘भाजीची गाडी आपल्या दारी’ हा नवीन उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेली भाजी घरपोच मिळणार आहे. नुकतंच महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. (BMC Vegetable Home Delivery)
क्रक्स रिक्स मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने संपूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेली पॅकबंद भाजी आणि फळे एका फोनवर मुंबईत घरपोच मिळणार आहेत.
क्रक्स रिक्स मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकांनी मीनाताई कांबळी यांनी महापौरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजीची गाडी आपल्या दारी या संकल्पनेचे सादरीकरण केलं.
क्रक्स रिक्स मॅनेजमेंटच्या संकल्पेनुसार, मुंबईकरांना मिळणारी भाजी ही शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट दिंडोरीतील प्रकल्प केंद्राजवळ संकलित केली जाईल. त्यानंतर या भाजीचे इथेनॉलद्वारे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येईल. यानंतर दुसऱ्या दिवशी ही पॅकबंद सकाळी मुंबईकरांना उपलब्ध होईल.
मुंबईत विविध सोसायटीमध्ये राहणारी मंडळी ग्रुप बुकिंग करु शकतात. त्यामुळे मुंबईकरांना भाजीची मागणी करायची असल्यास 9987736103 या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.
ना- नफा, ना- तोटा या तत्वावर ही संस्था काम करणार आहे, असे शिवसेना गट नेता मीनाताई कांबळी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी टाळणे गरजेचे आहे. ती टाळून इतरांशी संपर्क न येता घरपोच भाजी उपलब्ध होणार आहे. यामुळे सोशल डिस्टंसिंगचेही पालन होईल, असं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. (BMC Vegetable Home Delivery)
संबंधित बातम्या :
Mumbai Local | तीन महिन्यांनी मुंबईची लाईफलाईन पुन्हा रुळावर, अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु
महाराष्ट्रात खासगी लॅबमधील कोरोना चाचणीच्या दरात 50 टक्के कपात, नवी किंमत किती?