BMC Election 2022 : भाजपच्या पोलखोल यात्रेवरून सेना-भाजप आमनेसामने, दहीसरमध्ये रंगला वादाचा दुसरा अंक
भाजपच्या पोलखोल यात्रेच्या रथावर चेंबूरमध्ये कुणीतरी दगड मारला आणि सुरू झाले राजकीय आरोप प्रत्यारोप, तो वाद अजूनही थांबला नाही तोवर आज पुन्हा दुसरा वादाचा अंक सुरू झाल्याचे दिसून आले. कारण आज दहीरमध्ये पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनसामने आल्याचे दिसून आले.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) तोंडावर शिवसेने आणि भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचताना दिसून येत आहे. शिवसेना (Shivsena) गेल्या तीस वर्षांपासून शिवसेना मुंबई महापालिकेची एकहाती सत्ता गाजवत आहे. मात्र यावेळी शिवसेनेला सत्तेतून खाली उतरवण्याचा भाजपणे विडाच उचलला आहे. आणि त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यासाठी भाजप नेते जागोजाग फिरून नालेसफाईची पाहणी करत आहे. तर दुसरीकडे काही नेत्यांच्या नेतृत्वात भाजपने मुंबईत वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह आणि कार्यकर्त्यांसह पोलखोल यात्रा (BJP Polkhol Abhiyan) सुरू केलीय. मंगळवारी या यात्रेला सुरूवात झाली. मात्र ती सुरूवातही वादाने झाली. कारण भाजपच्या पोलखोल यात्रेच्या रथावर चेंबूरमध्ये कुणीतरी दगड मारला आणि सुरू झाले राजकीय आरोप प्रत्यारोप, तो वाद अजूनही थांबला नाही तोवर आज पुन्हा दुसरा वादाचा अंक सुरू झाल्याचे दिसून आले. कारण आज दहीरमध्ये पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनसामने आल्याचे दिसून आले.
सेना भाजप-पुन्हा आमनेसामने
त्यामुळे भाजपच्या पोलखोल अभियानावरून शिवसेना आणि भाजपमधील राडे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पोलखोल अभियानाला मुंबईत ठिकठिकाणी शिवसेनेकडून विरोध व्हायला लागला आहे. दहिसरमधे आज भाजपचे पोलखोल अभियान सुरू झालं, मात्र त्यापुर्वीच स्टेज उभारणीवरून शिवसेना नगरसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी स्टेज उभारणीला विरोध केला , आणि भाजपचे कार्यकर्ते भडकले. त्यामुळे बराच वाद रंगला आहे. भाजपच्या पोलखोल अभियानामुळे दररोज शिवसेना भाजपमध्ये तणावग्रस्त परिस्थितीत वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेवर भाजपचे आरोप
मंगळवारी झालेल्या दगडफेकीवरून फडणवीसांनी शिवसेनवर जोरदार निशाणा साधला होता. चेंबूरमधील हा हल्ला कुणी केला हे कायदा आणि सुवस्था ज्या महाविकास आघाडीकडे आहे तर तेच याबाबत सांगू शकतील. मात्र ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत, त्यांची पोलखोल करत आहोत, ते पाहून त्यामुळे त्यांना अस्वस्थता वाटत आहे. त्यातून आमच्यावर हल्ले सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली. तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. भाजप सहानुभूती मिळवण्यासाठी असे हल्ले घडवून आणत असल्याचा संशय महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला होता.
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, मात्र आता ताबा कोल्हापूर पोलिसांकडे! प्रकरण काय?
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलीसांकडे, मराठा समाजाबद्दलचं वक्तव्य भोवलं