शेलार म्हणाले, BMC मध्ये यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी, जाधव म्हणाले, तुम्ही तर आमदार, मनपात लुडबूड का?

सत्ताधारी शिवसेनेनं निधी वाटपात आपल्या नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाला निधी देताना हात सैल, तर भाजपला निधी वाटतांना मात्र सेनेने हात आखडता घेतल्याचं चित्र आहे.

शेलार म्हणाले, BMC मध्ये यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी, जाधव म्हणाले, तुम्ही तर आमदार, मनपात लुडबूड का?
Yashwant Jadhav_Ashish Shelar
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 5:26 PM

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal election) वर्षभरावर आली असताना नगरसेवक निधी वाटपात शिवसेनेने (Shiv Sena) खेळी केल्याचा आरोप होत आहे. नगरसेवक विकास निधी वाटपात शिवसेनेकडून भाजपची (Shiv Sena vs BJP) कोंडी केल्याचाही आरोप आहे. सत्ताधारी शिवसेनेनं निधी वाटपात आपल्या नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाला निधी देताना हात सैल, तर भाजपला निधी वाटतांना मात्र सेनेने हात आखडता घेतल्याचं चित्र आहे. (BMC election shiv sena gives more fund to its corporators  than BJP Ashish Shelar vs Yashwant Jadhav)

स्थायी समितीच्या 650 कोटी निधीपैकी सर्व नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे 227 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलं आहे. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात केलेल्या वाटपात मात्र मोठी तफावत आहे. महापालिकेत शिवसेनेचे 97 नगरसेवक असून त्यांना 233 कोटी निधीचे वाटप करण्यात आले.

तर भाजपचे 83 नगरसेवक असून त्यांना केवळ 60 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र कॉंग्रेसचे 29 नगरससेवक असून त्यांना संख्येच्या तीनपट म्हणजे 90 कोटींचा निधी देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक असून त्यांना 21 कोटी, तर समाजवादीचे 6 नगरसेवक असून त्यांना 18 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांचा हल्लाबोल

“स्थायी समिती अध्यक्ष हे मुंबई मनपाच्या अर्थसंकल्प आणि निधीवर स्वत:चा हक्क गाजवत आहेत. त्यांनी यशवंत जाधव प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशा भ्रमात राहू नये. हा मुंबईकरांचा पैसा आहे, मुंबईकरांनी कररुपाने दिला आहे. संपूर्ण मुंबईत समान विकास व्हावा. असमान विकासातून राजकारणात विषमता निर्माण करणं यापद्धतीने शिवसेनेचं काम सुरु आहे. 29 नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसला 81 कोटी आणि ज्या भागामध्ये भाजप नगरसेवक आहेत, त्या 83 प्रभागात केवळ 60 कोटी, या पद्धतीची विषमत करण्याचं पाप जाधवसाहेब तुम्हाला का सुचलं? स्वत:च्या पक्षाला, 90 नगरसेवकांसाठी 230 कोटी आणि भाजपच्या 83 नगरसेवकांसाठी 60 कोटी म्हणजे भाजपला निवडून देणाऱ्या जनतेने पाप केलंय का, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.

“स्वत:च्या प्रभागात 40 कोटी आणि इतर पक्षातील नगरसेवकाला शून्य, या विषमतेचा प्रकार शिवसेना करत आहे. हे पाप आहे, येणाऱ्या निवडणुकीत जनता शिवसेनेला धडा शिकवेलठ, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा पलटवार

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे. “मी 30 कोटी निधी घेतल्याचे सिद्ध करा, मी राजीनामा देईन अन्यथा तुम्ही तुमचे तोंड काळे करा. आहे का हिंमत? उगीच भुंकू नका”, असा घणाघात यशवंत जाधव यांनी केला.

आशिष शेलार, तुम्हीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडून बसलाय का? आमदार असतानाही या पालिकेत तुमचं काय गाडलंय, का लक्ष देताय? तुमचे पालिकेतील नेते अकार्यक्षम असल्यानं तुम्ही नेहमी लक्ष घालताय का? सर्व गटनेत्यांच्या सहमतीनं निधीचे वाटप झाले आहे, असं स्पष्टीकरण यशवंत जाधव यांनी दिलं.

संबंधित बातम्या  

BMC Budget 2021 updates live : 39 हजार कोटींचं बजेट सादर, मालमत्ता करात सरसकट माफी नाही

मुंबईकरांवर कराचा बोजा नाही, महापालिकेचा 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प सादर  

(BMC election shiv sena gives more fund to its corporators  than BJP Ashish Shelar vs Yashwant Jadhav)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.