BMC Elections: नव्या प्रभागांना अद्याप मंजुरी नाही, मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणार?; वाचा सविस्तर

लोकसंख्या बदलानुसार नवीन निवडणूक प्रभागांचे सीमांकन, फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीपूर्वी करण्यात आले आहे. पण, मंजुरीनंतरही इतर अनेक प्रक्रिया आहेत ज्या फेब्रुवारीपूर्वी पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे 2022 ची मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे.

BMC Elections: नव्या प्रभागांना अद्याप मंजुरी नाही, मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणार?; वाचा सविस्तर
BMC elections
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 1:32 PM

मुंबईः आगामी निवडणुकीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा आपल्या मतदार संगांमध्ये फेरबदल आणि वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे नव्या 236 प्रभागांचे सीमांकनही तयार केले आहेत. मात्र, राज्य सरकारने अद्याप याबाबत अंतिम अधिसूचना जारी केलेली नाही. मुंबईत सध्या 227 वॉर्ड आहेत जे 2022 पासून 236 पर्यंत वाढवले जाणार आहेत. हे नऊ अतिरिक्त प्रभाग-पश्चिम उपनगरात पाच, पूर्व उपनगरात तीन आणि शहरात एक जोडल्या जाणार असल्याची माहिती मिळतेय. पालिकेने 2017 च्या निवडणुकीत सुद्धा मुंबईतील प्रभागांच्या हद्दीतही फेरबदल आणि सुधारणा केल्या होत्या.

निवडणूक आयोग आणि राज्यपाल कार्यालयातून अंतिम मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकार अधिसूचना जारी करेल. लोकसंख्या बदलानुसार नवीन निवडणूक प्रभागांचे सीमांकन, फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीपूर्वी करण्यात आले आहे. पण, मंजुरीनंतरही इतर अनेक प्रक्रिया आहेत ज्या फेब्रुवारीपूर्वी पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे 2022 ची मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे.

का निवडणुका पुढे जाण्याची शक्यता?

नवीन प्रभाग सीमा निश्चित झाल्यानंतर, रहिवाशांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जातील. प्रत्येक वॉर्डाची सरासरी 54,000 लोकसंख्या आहे याची पालिकेला खात्री करावी लागेल, ज्यात 10 टक्क्यांपर्यंत फरक असू शकतो. या व्यतिरिक्त, जागांच्या आरक्षणाची लॉटरी काढली जाईल. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC) आणि महिलांसाठी आरक्षणाची लॉटरी काढली जाईल. केवळ दोन महिने शिल्लक असताना ही प्रक्रिया इतक्या लवकर पूर्ण होणार नाही, त्यामुळे निवडणुका वेळेवर होणे कठीण आहे, असे नगरसेवकांचे मत आहे.

मुंबई महापालिकेचे राषेट्रीय महत्त्व

भाजपने याआधी राज्य सरकारच्या मुंबईत नवीन प्रभाग जोडण्याच्या योजनेला, निवडणुका लांबवण्याचा डाव आहे असा आरोप केला होता. मविआ सरकार स्थापन झाल्यामुळे शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस एकत्र आहेत. सुरुवातीपासून बीएमसीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढले आहेत, पण यंदा चित्र वेगळे आहे. राज्यात भाजप एकटा आहे. दरम्यान, भाजप मनसेशी जवळीक साधत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईची निवडणूक शिवसेना आणि भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला राजकारणात नेहमीच राष्ट्रीय महत्त्व असते. बृहन्मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. त्यामुळे मुंबईत ज्या पक्षाची सत्ता आहे, त्याला राष्ट्रीय पातळीवर खूप महत्त्व आहे. हे कारण आहे, 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी आले होते.

इतर बातम्या

Maharashtra : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर महाराष्ट्र अलर्ट मोडवर, मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक

संभाजी ब्रिगेड पुढच्या महिन्यात राजकीय भूमिका जाहीर करणार; महापालिका निवडणुकांमध्ये पर्याय देणार?

Mann Ki Baat: सत्तेत नव्हे, सेवेत राहायचं आहे, मोदींची देशवासियांशी ‘मन की बात’

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.