बीएमसी अभियांत्रिकी सेवा-प्रकल्पांच्या संचालकपदाची धुरा पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याच्या खांद्यावर
अर्चना आचरेकर या 1984 पासून मुंबई महानगरपालिकेत काम (BMC Engineering And Projects Department Headed By Women) करतात.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्पांच्या संचालकपदी प्रथमच एक महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. अभियंता अर्चना आचरेकर असे या महिलेचे नाव असून पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी त्यांची नेमणूक केली आहे. अर्चना आचरेकर या 1984 पासून मुंबई महानगरपालिकेत काम करतात. (BMC Engineering And Projects Department Headed By Archana Achrekar A Woman For The First Time)
विशेष म्हणजे यानिमित्ताने अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्प विषयक संचालकपदी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची नेमणूक झाली आहे. यापूर्वी आचरेकर या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘नगर अभियंता’ अर्थात ‘सिटी इंजिनिअर’ म्हणून कार्यरत होत्या.
हेही वाचा –सरकारने ठरवलेले दरपत्रक बॅनरवर, कोरोनाग्रस्तांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना मनसेचा दणका
कोण आहेत अर्चना आचरेकर?
- अर्चना आचरेकर यांनी भारतातील अभियांत्रिकीय शिक्षणाचा पाया घालणाऱ्या मुंबईतील ‘वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ येथून अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
- त्यानंतर जानेवारी 1984 पासून त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत दुय्यम अभियंता म्हणून रुजू झाल्या होत्या.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आपल्या कारकिर्दी दरम्यान त्यांनी विविध खात्यातील विविध पदांवर काम केले आहे.
- आचरेकर यांची ‘संचालक’ पदी नियुक्ती झाल्यामुळे प्रथमच या पदावर एक जेष्ठ महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत. (BMC Engineering And Projects Department Headed By Archana Achrekar A Woman For The First Time)
Pandharpur Wari | मी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेhttps://t.co/T2L2C12sT7 #PandharpurWari #Ashadiwari #cmomaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2020
संबंधित बातम्या :
60 वर्षात पहिल्यांदा गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लॅबला भेट, अनिल देशमुख म्हणतात…