AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील पहिला प्रयोग मुंबईत, बोगद्यांमधील हवा खेळती राहण्यासाठी अत्याधुनिक ‘सकार्डो नोझल यंत्रणा’

सागरी किनारा मार्गांवरील बोगद्यांमधील हवा खेळती रहावी म्हणून मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिका तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतलाय.

देशातील पहिला प्रयोग मुंबईत, बोगद्यांमधील हवा खेळती राहण्यासाठी अत्याधुनिक ‘सकार्डो नोझल यंत्रणा'
| Updated on: Apr 06, 2021 | 1:13 AM
Share

मुंबई : सागरी किनारा मार्गांवरील बोगद्यांमधील हवा खेळती रहावी म्हणून मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिका तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार मुंबईतील सागरी किनारा मार्गामध्ये प्रत्येकी 2.07 किलोमीटर लांबीचे 2 महाबोगदे आहेत. या महाबोगद्यांमधील हवा खेळती रहावी, यासाठी या दोन्ही बोगद्यांमध्ये ‘सकार्डो नोझल’ ही अत्याधुनिक यंत्रणा (saccardo nozzle system) बसविली जाणार आहे. विशेष म्हणजे रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये देशात पहिल्यांदाच ही यंत्रणा बसविली जाणार आहे. यामुळे या मार्गातील बोगद्यांमध्ये ‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ या बीएमसीच्या घोषवाक्याप्रमाणे प्रवास शक्य होणार आहे (BMC going to install saccardo nozzle system in long tunnel in Mumbai).

मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे याविषयी बोलताना म्हणाल्या, “या यंत्रणे अंतर्गत प्रत्येकी 2 मीटर व्यासाच्या वैशिष्ट्यपूर्ण पंख्यांचा समावेश आहे. प्रत्येक बोगद्यासाठी 3 यानुसार दोन्ही बोगद्यांसाठी एकूण 6 पंखे असणार आहेत. यासाठी बोगद्यांच्या आतमध्ये तसेच बोगद्यांच्या वरती देखील वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम करुन तिथे ‘सकार्डो नोझल’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेचा उपयोग प्रामुख्याने बोगद्यांमधील हवा खेळती राहण्यासाठी होणार आहे. तसेच बोगद्यांमधून जात असलेल्या वाहनातून बाहेर पडणारा धूर बोगद्याच्या बाहेर ढकलण्यासही या यंत्रणेची मदत होणार आहे.”

अत्याधुनिक सकार्डो नोझल यंत्रणा कशी काम करणार?

‘सकार्डो नोझल’ या यंत्रणे अंतर्गत दोन्ही बोगद्यांच्या तोंडाजवळ पंख्यांशी जोडलेली वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा बसवली जाईल. तर या यंत्रणेमध्ये पंखे असलेला भाग बोगद्यांच्यावर एक इमारत बांधून त्यामध्ये बसविला जाणार आहे. यामध्ये असणारे पंखे हे प्रति मिनिट 1800 ‘राऊंड’ या उच्च वेगाने गोल फिरणारे असतील. प्रत्येक बोगद्यासाठी 3 याप्रमाणे दोन्ही बोगद्यांसाठी 6 पंखे असणार आहेत. तथापि, एकावेळी एका बोगद्यातील 2 पंखे सुरु राहणार आहेत. तिन्ही पंखे हे क्रमशः पद्धतीने कार्यरत राहतील. सकार्डो नोझल या यंत्रणेचे आयुर्मान हे 50 वर्ष आहे. आगीचा परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने ही यंत्रणा असणार आहे.

सकार्डो नोझल यंत्रणेचा फायदा काय?

सकार्डो नोझल या यंत्रणेद्वारे बोगद्याच्या एका बाजूने हवा अत्यंत तीव्रतेने आतमध्ये ढकलली जाई. बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने ती बाहेर ढकलली जाईल. बोगद्याची वाहतूक ज्या दिशेने जात असेल, त्याच दिशेने ही हवा खेळती राहील, याची काळजी या यंत्रणेद्वारे घेतली जाणार आहे. उदाहरणार्थ, बोगद्यामध्ये वाहनांचा प्रवेश ज्या ठिकाणाहून होत असेल, त्या ठिकाणी सकार्डो नोझल यंत्रणा बसविलेली असेल. या यंत्रणेतील पंख्यांद्वारे सदर ठिकाणची बाहेरील हवा बोगद्याच्या आतमध्ये वेगाने ढकलली जाईल. त्याचवेळी हवेच्या दाबामुळे बोगद्यातून वाहने बाहेर जातील, त्या दिशेने हवा वेगाने बाहेर फेकण्याचे काम देखील होईल. ज्यामुळे बोगद्यातील हवा खेळती राहण्यासोबतच वाहनांमधून सोडला जाणार धूर देखील बोगद्यातून लगेच बाहेर पडेल. प्रदूषण उत्सर्जित होऊन बोगद्यातील वातावरण चांगले राहण्यास मदत होईल.

गाडीला आग लागल्यास धुराचे लोट वेगाने बोगद्याबाहेर टाकता येणार

सुप्रभा मराठे म्हणाल्या, “एखाद्या दुर्दैवी प्रसंगी गाडीला आग लागल्यास त्यातून उत्पन्न होणारा धूर देखील या यंत्रणेद्वारे वेगाने बाहेरच्या दिशेने ढकलला जाईल. त्यामुळे धूर बोगद्यात साठणार नाही. आपत्कालिन परिस्थितीचे नियोजन करणे सुलभ होईल. हे लक्षात घेता, ही सकार्डो नोझल यंत्रणा अग्निशमन यंत्रणेस व आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणेस पूरक ठरेल.

हेही वाचा :

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन

कोरोनाला थोपवण्यासाठी मुंबईचे ‘मिशन लसीकरण’, रविवारीसुद्धा लोकांना लस मिळणार

Mumbai Corona : मुंबईत कोरोना रुग्णांचा गृहविलगीकरणाचा काळ वाढला, वाचा काय आहेत नियम?

व्हिडीओ पाहा :

BMC going to install saccardo nozzle system in long tunnel in Mumbai

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.