कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी BMC सज्ज, प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग

मुंबई महानगरामध्‍ये कोविड-19 विषाणू संसर्गाच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. यानुसार मुंबईतील प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी BMC सज्ज, प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 8:00 PM

मुंबई : मुंबई महानगराने कोविड-19 विषाणू संसर्गाच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी तयारी केली आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दोन दिवस क्षेत्रीय पाहणी दौरे करुन या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला आहे. विविध रुग्‍णालये व भव्‍य कोविड उपचार केंद्र (जम्बो सेंटर) तसेच कोरोना काळजी केंद्रे (सीसीसी) यातील रुग्‍णशय्या सुसज्ज करुन उपचारांसाठी उपलब्‍ध आहेत. त्यासमवेत लहान मुलांसाठी देखील स्‍वतंत्र असे कक्ष सर्व रुग्‍णालये व वैद्यकीय महाविद्यालयांसह जम्‍बो सेंटर्समध्‍ये कार्यान्‍व‍ित करण्‍यात येत आहेत. मुलांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी विशेष दक्ष राहण्याच्या सूचना काकाणी यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत (BMC inform about preparation to fight Corona third wave in Mumbai).

महानगरपालिका प्रशासन पूर्वतयारीनिशी सुसज्‍ज होत असली तरी कोविड संसर्गाची तिसरी लाट येवू नये, यासाठी मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक सर्व सुचनांचे व मार्गदर्शक तत्‍वांचे पालन करावे, विशेषतः लहान मुलांची अधिक काळजी घ्‍यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात येत आहे.

बीएमसी अतिरिक्त आयुक्तांकडून 2 दिवस आढावा/पाहणी दौरा

कोविड विषाणू संसर्गाच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, विशेषतः आरोग्‍य यंत्रणेने कामकाजाचा फेरआढावा घेवून पूर्वतयारी सुरू केली असून सदर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्‍याची प्रत्‍यक्ष पाहणी करुन आढावा घेण्‍यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी 22 जून आणि 23 जून असे दोन दिवस महानगरपालिकेची विविध रुग्‍णालये तसेच समर्पित कोविड आरोग्‍य केंद्र (जम्‍बो कोविड सेंटर्स) ची देखील पाहणी केली. या तयारीबद्दल समाधान व्‍यक्‍त करतानाच उर्वरित कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन सतर्क राहण्‍याचे निर्देशही आरोग्‍य यंत्रणेला त्‍यांनी दिले.

या आढाव्‍याबाबत माहिती देताना काकाणी म्‍हणाले की, “महानगरपालिकेची विविध रुग्‍णालये, जम्‍बो कोविड सेंटर्स, कोरोना काळजी केंद्र 1 (सीसीसी 1), कोरोना काळजी केंद्र 2 (सीसीसी 2) यामध्‍ये कोविड बाधितांसाठी रुग्‍णशय्या सुसज्ज असून उपचारार्थ उपलब्‍ध आहेत. यामध्‍ये जवळपास 2 हजार जीवरक्षक प्रणाली (व्‍हेंटिलेटर) रुग्णशय्या आहेत. वेगवेगळ्या जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये मिळून सुमारे 7 हजार 307 रुग्‍णशय्यांची क्षमता विकसित करण्‍यात आली. त्‍यावर जवळपास 77 हजार रुग्‍णांवर उपचार करण्‍यात आले.”

मुंबईत कोठे किती बेडची व्यवस्था?

आता जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍ये दुसऱ्या टप्‍प्‍यामध्‍ये 8 हजार 350 नवीन रुग्‍णशय्या क्षमता विकसित होण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यात कांजूरमार्ग येथे 2 हजार 200, मालाडमध्‍ये 2 हजार 200, शीव येथे 1 हजार 200, वरळी रेसकोर्स येथे 450, भायखळा येथील रिचर्डसन एण्‍ड क्रूडासमध्‍ये 700, गोरेगांव नेस्‍को 1 हजार 500, वरळी एनएससीआय येथे 100 याप्रमाणे रुग्‍णशय्या क्षमता वाढवण्‍यात आली आहे. म्‍हणजेच जम्‍बो सेंटर्समधील रुग्‍णशय्या क्षमता एकूण 15 हजार 657 इतकी होत आहे. यातील 70 टक्‍के रुग्‍णशय्या या वाहिनीद्वारे प्राणवायू पुरवठा असणाऱ्या आहेत.

प्रत्‍येक जम्‍बो कोविड सेंटरमध्‍ये द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवण टाक्‍या उपलब्‍ध आहेत. प्राणवायू सिलेंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये वातावरणातील हवेतून वैद्यकीय प्राणवायू उत्पादीत करणारी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्‍यामुळे प्राणवायूची अडचण नाही, असे काकाणी यांनी नमूद केले.

काकाणी म्‍हणाले की, तिसऱया लाटेचा सामना करताना लहान मुलांची विशेष काळजी घेण्‍याच्‍या सूचना लक्षात घेता, महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्‍णालय, वैद्यकीय महाविद्यालयासह जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍येही लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्‍यात येत आहे. कोविड-19 संसर्गाच्‍या अनुषंगाने उपचारांबाबत मार्गदर्शन करण्‍यासाठी आतापर्यंत तीन वेळा बालरोग तज्‍ज्ञांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. मुलांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याकडे विशेष लक्ष देत आहोत. तसेच, कोविड बाधित गरोदर मातांसाठी देखील स्वतंत्र कक्ष उभारण्‍यात आले असून त्‍यांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे.”

सद्यस्थितीत कोविडच्‍या दुसरी लाट ओसरली असली आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरु असले तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी प्रतिबंधक नियमांचे योग्‍यरित्‍या पालन केले पाहिजे. लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाची योग्‍य काळजी घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी प्रशासनाच्‍यावतीने केले आहे.

काकाणी यांनी मालाडमध्‍ये मुंबई विकास प्राधिकरणामार्फत नव्याने उभारण्यात येत असलेले कोविड केअर सेंटर, गोरेगाव जम्बो कोविड सेंटर, बी. के. सी. जम्बो कोविड सेंटर, दहिसर जम्बो कोविड सेंटर, कांजूरमार्ग कोविड सेंटर येथे भेट दिली. यावेळी उपायुक्त (परिमंडळ 7) विश्वास शंकरवार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, उपआयुक्त (भूसंपादन) अनिल वानखेडे, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे, गोरेगांव नेस्को जम्‍बो कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रादे, बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांच्‍यासह सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, अलका ससाणे, विभास आचरेकर, गजानन बेल्‍लाळे, सिडकोचे अधीक्षक रमेश गिरी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

मुंबई महापालिकेत 1850 ते 2070 पदांवर कंत्राटी तत्वावर भरती, 30 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार

वेगवान लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन, जाणून घ्या सर्वकाही

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची सखोल चौकशी, 48 तासांत अहवाल सादर करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश

व्हिडीओ पाहा :

BMC inform about preparation to fight Corona third wave in Mumbai

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.