BMC Home Isolation Guidelines | मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी गाईडलाईन्स जारी, नवे नियम काय ?
ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे असतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, शिवाय ताप नसेल, ऑक्सीजन पातळी सुद्धा नॉर्मल असेल अशा व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यास परवानगी असेल.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी मुंबईतदेखील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढताना दिसतोय. मुंबईत 24 तासांत 20181 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलेच लक्षणे दिसत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर अशा कोरोना रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवताना नेमक्या कोणत्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे, याबाबत मुंबई पालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कुठला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगीकरणत राहू शकतो ?
♦ ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे असतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, शिवाय ताप नसेल, ऑक्सीजन पातळी सुद्धा नॉर्मल असेल अशा व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यास परवानगी असेल.
♦ अशा रुग्णाला स्वतः शिवाय आपल्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात राहण्याची सोय असावी.
♦ जे रुग्ण 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील आहेत किंवा जे रुग्ण कॉमॉरबीडिटी आजाराचे आहेत जसे की डायबेटिक, हायपर टेन्शन, हृदयाचा आजार, किडनीचा आजार अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आरोग्य अधिकार्यांच्या तपासणीनंतर गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी दिली असेल तरच गृहविलगीकरणात उपचार घेता येतील.
♦ ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल (किंवा अशी व्यक्ती एचआयव्ही, कॅन्सर थेरपीसारख्या आजारातून जात असेल) अशा रुग्णांना गृहविलगीकरणासाठी परावनगी नसेल. आरोग्याधिकारी/ डॉक्टरांनी अशा रुग्णाला तपासल्यानंतर जर गृह विलीगीकरणात राहण्याची परवानगी दिली तरच अशा रुग्णाला गृह विलीगीकरणमध्ये राहता येईल.
♦ जेव्हा एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरत असेल तर त्याच्या कुटुंबातील संपर्कात आलेल्या सदस्यांनीसुद्धा गृह विलीनीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायचे आहे.
♦ गर्भवती महिला जिची बाळंतपणाची अपेक्षित तारीख दोन आठवड्यावर आहे अशा रुग्णाला गृह विलगीकरणत ठेवता येणार नाही
♦ गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःला घरातील एका खोलीमध्ये आयसोलेट करायचे आहे. इतर कुटुंबातील सदस्यांच्या, वयोवृद्ध व कॉमॉरबीडिटी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येणे काटेकोरपणे टाळायचे आहे.
♦ गृह विलगीकरणत असलेल्या रुग्णाने ट्रिपल लेअर किंवा एन 95 मास्कचा वापर करावा व दर आठ तासाने मास्क बदलावे.
*गृह विलगीकरणत असलेल्या रुग्णाने इतरांसोबत कोणत्याही वस्तू शेअर करू नयेत, इतरांच्या वस्तू वापरू नये.
♦ स्वतःहून शरीराचे तापमान सोबतच ऑक्सिजनची पातळी तपासावी.
♦ गृह विलगीकरणत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःहून स्वच्छता ठेवावी.
इतर बातम्या :
खूशखबर ! आता लग्नाच्या वऱ्हाडासाठीही करता येणार रेल्वे बूक, जाणून घ्या आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया
Nagpur | स्टेराईडचा अतिवापर धोकादायक! काय म्हणतात, अस्थिरोगतज्ज्ञ