मेट्रोचे कर्मचारी करणार आपत्तीशी सामना, मुंबई पालिका देणार अडीच हजार कामगारांना प्रशिक्षण

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा आता मेट्रोचे कर्मचारीही सामना करणार आहेत. (bmc organised disaster management workshop for metro workers)

मेट्रोचे कर्मचारी करणार आपत्तीशी सामना, मुंबई पालिका देणार अडीच हजार कामगारांना प्रशिक्षण
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 8:22 PM

मुंबई: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा आता मेट्रोचे कर्मचारीही सामना करणार आहेत. मुंबई महापालिका मेट्रोच्या 2500 कर्मचाऱ्यांना आपत्तीचा सामना कसा करायचा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना संकटाच्या काळात या प्रशिक्षणाचा फायदाच होणार आहे. (bmc organised disaster management workshop for metro workers)

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत ‘मेट्रो प्रकल्प 2’ आणि ‘प्रकल्प 3’ चे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबई मेट्रो व महानगरपालिका यांच्या संयुक्त बैठकांमध्ये मुंबई मेट्रोच्या स्तरावर आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणाची गरज असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी पुढाकार घेऊन ही बाब ‘मुंबई मेट्रो’ च्या निदर्शनास आणून‌ दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्याची विनंती मुंबई मेट्रोद्वारे पालिकेला करण्यात आली. त्यानुसार पालिकेचे शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचे आयोजन करून प्रशिक्षणाचे स्वरुप, प्रात्याक्षिके दाखविणे व करून घेणे आदींचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर मेट्रो प्रकल्प 2 आणि 3च्या 2 हजार 500 अधिकारी- कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्याचे नियोजन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे करण्यात आले आहे.

काही कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण

दरम्यान, पालिकेने मेट्रोच्या काही कर्मचाऱ्यांना मेट्रो रेल्वेच्या चारकोप येथील आगारात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिलं आहे. मेट्रो प्रकल्प 2 आणि 3 लवकरात लवकर कार्यान्वित करावयाचा असल्यामुळे यापुढील कार्यशाळा ‘कोवीड-19’ बाबतची सर्वतोपरी काळजी घेऊन पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात येणार आहेत. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रातील मेट्रो रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ऊर्वरीत बॅचेसमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राद्वारे देण्यात आली आहे.

आपत्ती आणि धोक्यांचे प्रशिक्षण

यावेळी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनना आपत्कालीन व्यवस्थापनाची आवश्यकता, आपत्ती म्हणजे काय, धोक्यांची ओळख, धोके म्हणजे काय, जोखिम कशी ओळखावी, जोखिम म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, विविध प्रकारच्या आपत्तीमध्ये अगोदर, नंतर काय करावे व काय करू नये, आपत्कालीन व्यवस्थापन चक्र (सज्जता, उपशमन, प्रतिरोध तसेच प्रतिसाद ) आदी गोष्टींची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पालिकेतील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कार्य, मेट्रो रेल्वे प्रकल्पात काम करीत असताना उद्भवू शकणारे संभाव्य धोके याबबत चर्चा करून त्याबाबतीत सज्जता, उपशमन, प्रतिबंध कसे करावे व घटना घडलीच तर प्रतिसाद कसा द्यावा? याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आग म्हणजे काय, आगीचे प्रकार, आग लागू नये म्हणून काय नियोजन करावे, रासायनिक व विद्यूत आग लागल्यास काय करावे व काय करू नये, तसेच अग्निशमन प्रणाली आणि अग्निशमके हाताळण्याबाबतची प्रात्यक्षिके, प्रथमोपचार म्हणजे काय, प्रथमोपचाराची मार्गदर्शक तत्वे, जखमांचे प्रकार, लक्षणे आणि उपचार, ट्रॉमा व्यवस्थापन तसेच सी.पी.आर. म्हणजे काय? तो कधी व केव्हा द्यावा, इत्यादी बाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.

गाठी मारण्यापासून स्ट्रेचर बनविण्यापर्यंत…

त्याचबरोबर आणीबाणीच्या प्रसंगी दोराच्या सहाय्याने सुटका कशी करायची, विविध प्रकारच्या गाठी बांधणे, गाठींचे उपयोग, कोणत्या प्रकारची गाठ कोणत्या आणिबाणी मध्ये सुटका करून घेण्यासाठी उपयोगात येवू शकते याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. स्ट्रेचर कसे उचलावे, उपलब्ध साधनांपासून सुधारीत स्ट्रेचर कसे बनवावे आणि त्याचा वापर कसा करावा, बँडेजेसचे प्रकार व सुधारीत बँन्डेजेस कसे तयार करावे, उपलब्ध साधनांपासून जखमींना वाहून नेण्याच्या विविध पध्दतींचे शिक्षण प्रात्यक्षिकांसह देण्यात आले.

मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी विझवली आग

विशेष म्हणजे यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या तुकड्यांमधील कर्मचाऱ्यांनी चारकोप आगार येथे लागलेली आग ताबडतोब विझवली. त्यामुळे मोठी हानी रोखता आल्याचे मेट्रोचे उप-महाव्यवस्थापक (संचालन) पटवर्धन यांनी सांगितले. (bmc organised disaster management workshop for metro workers)

संबंधित:

‘अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण टिकवता येत नाही’, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिकचा तिसऱ्या टप्प्यात समावेश, सर्व दुकान, आस्थापना 4 वाजेपर्यंत सुरू राहणार : छगन भुजबळ

Maharashtra News LIVE Update | सांगलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे कारखान्याचे पत्रे उडाले, भटवाडी गावात अनेक घरे पडली

(bmc organised disaster management workshop for metro workers)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.