Omicron Virus: टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू; महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार
टांझानियातून आलेल्या एका व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा ओमिक्रॉनचा अहवाल अद्याप यायचा असून या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची ही तपासणी केली जात आहे.
मुंबई: टांझानियातून आलेल्या एका व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा ओमिक्रॉनचा अहवाल अद्याप यायचा असून या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची ही तपासणी केली जात आहे. तसेच हाय रिस्क कंट्रीतून आलेल्या नागरिकांची बॅक हिस्ट्रीही तपासली जात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टांझानिया येथून आलेला व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे त्याची जिनोम सिक्वेन्स तपासणी करण्यात येत आहे. सध्या त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी केली जात आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं. हाय रिस्क कंट्रीतून आलेल्यांची बॅक हिस्ट्रीही तपासली जात आहे. ओमायक्रॉनचा फैलाव होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
धारावीतील रुग्ण संख्या शून्यावर आणू
कोरोनाच्या काळात महापालिका अधिकाऱ्यांनी धारावीत प्रचंड काम केलं. धारावीकरांनी त्याला मोलाची साथ दिली. आता धारावीतील रुग्ण संख्या शून्यावर आणण्यावर भर आहे. धारावीत टांझानियातून आलेला व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला आहे. पण त्याचे अहवाल आल्यावरच त्याला कोरोनाची लागण आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच पुढील उपाययोजना केल्या जाईल, असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.
महापालिकेचा पंचसूत्री कार्यक्रम
ओमिक्रॉनला फैलाव होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने खूप काळजी घेतली आहे. ओमिक्रॉनचं संकट वाढत चाललं आहे. देशभरात त्याचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे हाय रिस्क देशातून आलेल्यांची तपासणी केली जात आहे. पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांना कोव्हिड रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. या सर्वांना वॉररूममधून कॉल जात आहे. आपण त्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मास्क नाकाखाली लावू नका
कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष आपल्याला कडक नियम पाळावे लागले. पण संकट अजून गेलेले नाही. त्यात आता नव्या विषाणूचं संकट आलं आहे. त्यामुळे सर्वांनी अजूनही नियम पाळले पाहिजे. मास्क तोंडाला लावायचे आहे. नाकाखाली मास्क लावू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
प्रत्येक भीमसैनिकांची काळजी घेणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवा आजार रोखण्यासाठी जे जे करता येईल, ते ते करा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच आम्ही सज्ज झालो आहोत. आमची टीम कार्यरत आहे. महापरिनिर्वाण दिनी भीम सैनिक मोठ्या प्रमाणावर चैत्यभूमीवर येतात. त्यांचीही काळजी घेतली जाणार आहे. आंबेडकरी अनुयायी घरी जाईपर्यंत त्यांची काळजी घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 5 December 2021 pic.twitter.com/mNZ6o6uFia
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 5, 2021
संबंधित बातम्या:
Washim : लस न घेणाऱ्यांना प्रशासनाचा दुसऱ्या दिवशीही दणका, 53 जणांकडून दंड वसूल
Maharashtra News LIVE Update | संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता बदलीचे नवे संकट