कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पालिकेच्या तब्बल 228 कर्मचाऱ्यांना कोविडमुळे जीव गमवावा लागला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे.

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 8:20 AM

मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोना रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पालिकेच्या तब्बल 228 कर्मचाऱ्यांना कोविडमुळे जीव गमवावा लागला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे. यातील 91 जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत तर 90 जणांच्या वारसांना नोकरी दिली जाणार आहे. मुंबई महापालिकेने नुकतंच याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. (BMC Provide financial Help to the families who died during Corona period)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. मुंबई महापालिकेच्या 6766 कर्मचाऱ्यांना दीड वर्षात कोरोनाची लागण झाली. यातील तब्बल 5803 कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.

केंद्राकडून 50 लाखांची मदत

मात्र तब्बल 228 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोविड डय़ुटी करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदत करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पालिकेने आर्थिक मदतीसाठी 200 प्रस्ताव केंद्राकडेही पाठवले होते. मात्र यातील केवळ 19 प्रकरणांत केंद्राने 50 लाखांची मदत दिली आहे.

तर उर्वरित कुटुंबांना आधार देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यानुसार 91 जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर 90 जणांच्या वारसांना नोकरीही दिली जाईल, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेचे 967 कर्मचारी अजूनही कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पालिका मदत करणार

कोविड कामासाठी अनेक कंत्राटी कर्मचाऱयांची भरती करण्यात आली. शिवाय पालिकेचे शेकडो कंत्राटी कर्मचारीही आहेत. यामध्ये कोविड डय़ुटी करताना 9 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. यामध्ये कंत्राटी कामगार मृत्यू झालेले 3 प्रस्तावही केंद्राने मंजूर केले आहेत. तर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांना पालिका आर्थिक मदत देणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

(BMC Provide financial Help to the families who died during Corona period)

संबंधित बातम्या :

प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकारकडून 155 कोटी खर्च, सोशल मीडियावर 6 कोटींचा खर्च

पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाडं लावली जाणार, भाजप खासदार गोपाळ शेट्टींचा संकल्प

हिंदमाताजवळ पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होणार, आदित्य ठाकरेंकडून कामाची पाहणी

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.