ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारणी प्रकल्पात कोणताही घोटाळा नाही; मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण

Medical Oxygen उपलब्ध करण्यासाठी, मुंबई महापालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये 16 ठिकाणी वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू उत्पादन करणाऱ्या संयंत्राची उभारणी करण्यात येत आहे.

ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारणी प्रकल्पात कोणताही घोटाळा नाही; मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 8:56 PM

मुंबई : कोव्हिड-19 बाधित रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय प्राणवायू (Medical Oxygen) उपलब्ध करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये एकूण 16 ठिकाणी वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू उत्पादन करणाऱ्या संयंत्राची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनावर प्रसारमाध्यमातून आरोप करण्यात आले आहेत. सदर आरोप महानगरपालिका प्रशासन स्पष्टपणे फेटाळत आहे. प्राणवायू उत्पादन संयंत्रांचा हा प्रकल्प ई-निविदा प्रक्रिया पार पाडून उभारला जात असून त्यात कोणतीही प्रशासकीय किंवा आर्थिक अनियमितता झालेली नाही, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सदर आरोपांबाबत मुद्देनिहाय पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे. (BMC says There is no scam in the Oxygen Generation Plant Erection Project)

कोव्हिड-19 विषाणू बाधेमुळे रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर मुख्यत्वाने प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्राणवायू उपलब्‍धतेबाबत कायमस्‍वरुपी उपाययोजना म्‍हणून एकूण 12 रुग्‍णालयांमध्‍ये मिळून 16 प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प (प्‍लांट) उभारण्‍याचे  निश्चित केले आहे. यामध्‍ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल. या सर्व 16 प्रकल्‍पांतून मिळून प्रतिदिन एकूण 43 मेट्रिक टन प्राणवायू साठा निर्माण होणार असल्‍याने प्राणवायू पुरवठ्यावरील महानगरपालिकेचे परावलंबित्‍व कमी होण्‍यास मदत होणार आहे.

पहिला आरोप : अवाजवी दर

प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आलेल्या आरोपात पहिला आरोप आहे तो अवाजवी दराचा. या संदर्भात महापालिकेने म्हटले आहे की, सदर प्राणवायू उत्पादन संयंत्राची उभारणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया करताना योग्य पद्धतीने अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यासाठी या क्षेत्रातील विविध उत्पादकांकडून आणि अधिकृत वितरकांकडून अंदाजित दरपत्रक मागविण्यात आले होते, त्यासोबत स्वतंत्रपणे बाजार सर्वेक्षण करूनदेखील अंदाजित दरपत्रक घेण्यात आले होती. केंद्र सरकारच्या अधिकृत इ-मार्केट प्लेस (जेम पोर्टल) या संकेतस्थळावरून देखील या दरांची तुलना करण्यात आली होती. प्राप्त अंदाज दरपत्रक आणि जेम पोर्टल यातील दरांमध्ये साम्य आढळले. म्हणजेच निविदा प्रक्रिया करताना अंदाजपत्रक योग्य पद्धतीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे बाजार मूल्यापेक्षा अधिक दराने संयंत्राची खरेदी केल्याचा आरोप बिनबुडाचा ठरतो.

दुसरा आरोप : मार्गदर्शनाशिवाय ऑक्सिजन प्लांटची उभारणी

दुसऱ्या आरोपामध्ये म्हटले आहे की, महानगरपालिकेने तज्ज्ञ अथवा सल्लागारांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेऊन संयंत्राची उभारणी करणे आवश्यक होते. याबाबत महापालिकेने स्पष्ट केले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयांमध्ये यापूर्वीच हवा शोषून त्यातून वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणारे संयंत्र उभारण्यात आले आहे. त्याच्या कामकाजाचा, हातळणीचा अनुभव महानगरपालिका प्रशासनाच्या गाठीशी आहे. त्यामुळे पुन्हा अशी संयंत्र उभारताना सल्लागार किंवा तज्ज्ञ नेमण्याची, त्यांचा सल्ला घेण्यासाठी अकारण खर्च करण्याची आवश्यकताच शिल्लक राहत नाही.

तिसरा आरोप : निविदा प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

अंदाजपत्रक योग्यरीत्या तयार केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने प्रचलित पद्धतीने खुली ई-निविदा प्रक्रिया पार पाडली. यामध्ये एकूण तीन संभाव्य पुरवठादार यांचा प्रतिसाद प्राप्त झाला. यापैकी मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने निविदेतील सर्व निकषांची पूर्तता केल्याने ते पात्र ठरले.

चौथा आरोप : ब्लॅकलिस्टेड कंपनीला कंत्राट

महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने संयंत्रांचे मूळ उत्पादक म्हणून मेसर्स युनिसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव पुरवले आहे. या अनुषंगाने आरोप करण्यात आले आहेत की, जयपूर (राजस्थान) येथील सवाई मानसिंग रुग्णालयाने मेसर्स युनिसी इंडिया या कंपनीला काळ्या यादीत टाकले असल्याची बाब माहीत असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी यांना पात्र ठरवले. या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही.

मेसर्स युनिसी इंडिया कंपनीला जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयाने 28 नोव्हेंबर 2020 रोजी काळ्या यादीमध्ये टाकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय (राजस्थान) यांनी काळ्या यादीत टाकण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. विशेष म्हणजे राजस्थान सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारने मेसर्स युनिसी इंडिया कंपनीला दिनांक 7 मे 2021 रोजी प्राणवायू उत्पादन संयंत्र प्रकल्प उभारणी करण्यासाठी कार्यादेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर सवाई मानसिंग रुग्णालयाने देखील या कंपनीला काळ्या यादीत टाकलेल्या कालावधीतच कार्यादेश दिला आहे. एकूणच राज्य सरकारांनी सदर कंपनीला दिलेले कार्यादेश तसेच जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती लक्षात घेता या कंपनीने सादर केलेले कामगिरी प्रमाणपत्र अर्थात परफॉर्मन्स सर्टिफिकेट ग्राह्य धरून मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन यांना सकारात्मक प्रतिसादक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निविदेत पात्र ठरवण्यात आले आहे.

प्राणवायू उत्पादन संयंत्र उभारणी निविदा प्रक्रियेला स्थायी समितीच्या 9 जून 2021 च्या सभेत मंजुरी प्राप्त झाली. तसे पत्र प्रशासनाला प्राप्त होताच 14 जून 2021 रोजी स्वीकृती पत्र कंत्राटदारास देण्यात आले. त्यानंतर लागलीच म्हणजे दिनांक 16 जून 2021 रोजी संयंत्र उभारणी करावयाच्या ठिकाणांची पाहणी करून त्याचे हस्तांतरण करण्यात आले. त्यानुसार उभारणीच्या जागी बांधकाम विषयक कामे सुरू करण्यात आली असून योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी संबंधित पुरवठादारांकडून अर्ज देखील करण्यात आले आहेत.

30 दिवसांच्या मुदतीत प्रकल्प उभारणी पूर्ण करण्याचे नियोजन

कांदिवली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयामध्ये प्राणवायू उत्पादन संयंत्र प्राप्त झाले आहे. उर्वरित सर्व ठिकाणीदेखील विहित 30 दिवसांच्या मुदतीमध्ये प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यात उत्पादित होणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून मान्यता घेण्यात येईल.

थोडक्यात, वातावरणातील हवा शोषून त्यातून वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू उत्पादित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेली संपूर्ण कार्यवाही ही प्रशासकीय नियमांना अनुसरूनच आहे. त्यामध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही. कोरोना बाधित रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या सेवा सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेने ही कार्यवाही हाती घेतली असून ती यथायोग्य आहे, असे पालिकेने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

पहिला-दुसरा डोस, लसीसाठी कोणत्या ठिकाणी जायचं? मुंबईतील लसीकरण केंद्रांची इत्यंभूत माहिती

(BMC says There is no scam in the Oxygen Generation Plant Erection Project)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.