BMC election seat reservation 2022 : मुंबईत अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या किती? आरक्षित जागा किती?, आरक्षणाचं सूत्रं काय?; वाचा सविस्तर

BMC election seat reservation 2022 : मुंबई महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 15 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर सर्व साधारण महिला वर्गासाठी 109 जागा राखीव आहेत.

BMC election seat reservation 2022 : मुंबईत अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या किती? आरक्षित जागा किती?, आरक्षणाचं सूत्रं काय?; वाचा सविस्तर
मुंबई महापालिकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 12:00 PM

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (bmc) आरक्षणासाठी (reservation) महापालिकेने एक सूत्रं स्वीकारलं असून त्यानुसारच आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. गेल्या तीन महापालिका निवडणुकीत जे वॉर्ड आरक्षित नव्हते, त्या वॉर्डात आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गेली तीन टर्म एकाच वॉर्डातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या वॉर्डातील एकाच नगरसेवकांची (corporater) मक्तेदारी मोडीत निघाली असून त्या ठिकाणी आता नवीन चेहरा नगरसेवक म्हणून दिसणार आहे. आरक्षण चक्रानुक्रमे ही आरक्षण सोडत काढली गेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार मुंबईची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 8 लाख 3 हजार 236 इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 लाख 29 हजार 653 एवढी आहे. त्यामुळे हे मतदार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 15 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर सर्व साधारण महिला वर्गासाठी 109 जागा राखीव आहेत. या आरक्षित जागांनुसारच सोडत काढण्यात आली. आरक्षण चक्रानुक्रमे फिरवून निश्चिती करून व आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. प्रभागाचे आरक्षण हे प्रभागाच्या रचनेवर अवलंबून नसून प्रभाग ज्या प्रगणक गटांनी (Enumeration Block) बनलेला आहे, अशा प्रगणक गटांच्या त्या त्या वेळेच्या आरक्षणावर अवलंबून आहे, असं महापालिकेने आरक्षण सोडत काढण्यापूर्वीच स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

आरक्षण चक्रानुक्रमे ठरविण्याची कार्यपध्दती काय?

  1. आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याच्या प्रयोजनार्थ सन 2022 मध्ये होणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची चौथी निवडणूक आहे.
  2. त्यामुळे सन 2007, 2012 व सन 2017 मध्ये असलेले प्रभागांचे आरक्षण विचारात घेऊन या निवडणुकीमध्ये आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे आवश्यक आहे. याकरिता एखाद्या प्रभागात मागील निवडणुकीत कोणते आरक्षण होते हे निश्चित करताना पुढील कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी.
  3. आरक्षणाकरिता एखादा प्रभाग नवीन आहे किंवा कसे, हे केवळ त्याच्या नावावरुन ठरविण्यात येणार नाही.
  4. एखाद्या प्रभागावरील पूर्वीचे आरक्षण ठरविण्यासाठी जे (Enumeration Block) प्रगणक गट त्या प्रभागात समाविष्ट केले गेले आहेत, त्यावरील जास्तीत जास्त समान आरक्षण असलेल्या प्रगणक गटांच्या लगतच्या जनगणनेनुसार असलेल्या एकूण लोकसंख्येची बेरीज घ्यावी.
  5. ही लोकसंख्येची बेरीज प्रभागाच्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर तो प्रभाग मागील निवडणूकीमध्ये त्याकरिता आरक्षित झाला होता असे मानण्यात येईल. तसेच ते आरक्षण त्या प्रभागावर टाकता येणार नाही.
  6. मात्र, जास्तीत जास्त समान आरक्षण असलेल्या प्रगणक गटांच्या लगतच्या जनगणनेनुसार असलेल्या एकूण लोकसंख्येची बेरीज प्रभागाच्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल तर तो प्रभाग नवीन आहे, असे मानण्यात येईल. तसेच त्या प्रभागावर कोणतेही आरक्षण टाकता येईल.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.