मुंबई महानगरपालिका अवलंबणार अद्ययावत SAP HANA प्रणाली, उपयोग काय?

महानगरपालिकेमध्‍ये वापरात असलेली 'सॅप मूलभूत' प्रणाली आता 'सॅप हाना' (SAP HANA) या अद्ययावत आवृत्‍तीमध्‍ये अपडेट करण्‍यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका अवलंबणार अद्ययावत SAP HANA प्रणाली, उपयोग काय?
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:10 PM

मुंबई : मुंबईकर नागरिकांना अद्ययावत आणि गुणवत्‍तापूर्ण नागरी सेवा-सुविधा पुरविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका नेहमीच प्रयत्‍नशील असते. त्‍याचाच एक भाग म्‍हणून महानगरपालिकेमध्‍ये वापरात असलेली ‘सॅप मूलभूत’ प्रणाली आता ‘सॅप हाना’ (SAP HANA) या अद्ययावत आवृत्‍तीमध्‍ये अपडेट करण्‍यात येणार आहे. या कामकाजासाठी सॅप मूलभूत प्रणाली ही 11 जून 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 28 जून 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. (BMC will adopt updated SAP HANA system, What an advantage?)

बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वोत्तम व तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नांचा भाग म्हणून महानगरपालिकेने नागरिक, कंत्राटदार तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध कामकाजासाठी सॅप या मुलभूत सॉफ्टवेअर प्रणालीचा अंगीकार केला आहे.

सॅप प्रणाली अद्ययावत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच सर्वोत्‍तम सेवा देता यावी, यासाठी महानगरपालिकेने SAP HANA या अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्‍वीकार करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्‍या वापरात असलेली सॅप मूलभूत प्रणाली ही सॅप हाना या नवीन व अद्ययावत अशा आवृत्‍तीमध्‍ये स्थलांतरित करणे आवश्यक आहे.

सॅप हाना या नवीन प्रणालीमध्ये दस्तऐवज साठवण्याची सुविधा, नवीन अॅप्लिकेशन्स अधिक जलदरित्या तपासून कार्यान्वित करणे, अधिक जलद वेगाने प्रक्र‍िया करणे, नवीन युजर इंटरफेस, अधिक प्रतिसादात्मक आणि वापरण्यास सुलभ मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि तसेच प्रकारचे डॅशबोर्ड उपलब्ध आहेत.

या अद्ययावत लाभांसाठी सध्या कार्यान्वित असलेल्या सॅप प्रणालीचे सर्व्हर्स बंद करून त्याचे सॅप हाना प्रणालीवर स्‍थानांतरासह अद्ययावतीकरण (अपडेट) केले जाणार आहे. सध्याच्या क्लाउड सेवांचा कंत्राट कालावधी संपणार असल्याने महानगरपालिकेची संगणक प्रणाली नवीन क्लाउडवर स्थलांतरित करण्याचे कामकाजही या कालावधीमध्येच करण्यात येणार आहे.

सॅप प्रणाली 11 ते 28 जून दरम्यान बंद

ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला सॅप प्रणाली 11 जून 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 28 जून 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत बंद ठेवावी लागणार आहे. संपूर्ण सॅप प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याने या कालावधीत नागरिक आणि कर्मचारी सॅप प्रणालीवरील कोणतेही व्यवहार जसे की, नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, कार्यादेश देणे, अधिदान करणे इत्यादी कामकाज करू शकणार नाहीत.

संकेतस्‍थळं सुरु राहणार

मात्र, महानगरपालिकेच्या सॅप प्रणाली व्यतिरिक्त इतर सेवा या नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी https://ptaxportal.mcgm.gov.in, जलदेयकांचा भरणा करण्याकरिता https://aquaptax.mcgm.gov.in, ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगी अर्जासाठी https://autodcr.mcgm.gov.in ही संकेतस्‍थळं सुरु राहणार आहेत.

निविदा प्रक्रिया सुरु राहणार

तसेच, महानगरपालिकेमार्फत मागविल्या जाणाऱ्या निविदा महाराष्ट्र शासनाच्या इ-टेंडरिंग प्रणालीवर मागवल्या जाणार असल्याने निविदा प्रक्रिया देखील सुरु राहणार आहेत. उपरोक्त कालावधीमध्ये सॅप मूलभूत प्रणाली बंद राहणार असल्‍याने आवश्‍यक कामकाज त्‍वरित पूर्ण करुन मुंबईकर नागरिक, कंत्राटदार तसेच कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

इतर बातम्या

मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार, महापौर किशोर पेडणेकर म्हणतात…

‘कोरोनाकाळात मुंबईत शिवसेनेने चांगलं काम केलंय, निवडणूक हरण्याचा प्रश्नच येत नाही’

(BMC will adopt updated SAP HANA system, What an advantage?)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.